
इतिवृत्त
नोटीस काढले सभेचे
इतिवृत्त वाचले सभेचे
विषयानुरूप प्रस्ताव
प्रस्तुत मांडले सभेचे ॥
आमसभा मासिक होती
हजर ग्रामस्थ लोक होती
सभासद अध्यक्षतेखाली
बैठक पार पडली होती ॥
तपशिलवार यादी निविदा
कळो मज संदर्भ मसूदा
अनुमोदन दर्शवती सारे
आढावा असोत बाकायदा ॥
शाळेमधे आयोजित केली
पालकसभा मेळावे झाली
पाल्यांची गुणवत्ता प्रगती
मुख्याध्यापकांनी निकाल
घोषित केली ॥
सखोल आवर्जुन सांगावे
इतिवृत्तातले बारकावे
नको इत्यादी लपंडाव घोटाळे
सामोपचाराने माहिती द्यावे ॥
सभा तहकूब होणार नाही
सभागृही दक्षता पाळू काही
गदारोळ न घालता ऐकूया
पटले निर्णय तर देऊ सही ॥
पवन सु.किन्हेकर, वर्धा