
निसर्गपूजक
काळी माय माझी
तहान भूक भागवी
श्रावणसरी वर्षता
रूप दिसते लाघवी
काळी माय माझी
मोतीयाचे देई दान
निसर्गपूजक रे मी
कष्टानं फुलवी रान
काळी माय माझी
तप्त झळा रे सोसते
भरविते आई घास
स्वप्नपुर्तीची रे आस
काळी माय माझी
निसर्गपूजक बनू सारे
वसा घेऊ समतेचा
धरणीच्या रे ममतेचा
संग्राम कुमठेकर
मु.पो.कुमठा (बु.)
ता.अहमदपूर जि.लातूर