
गपगुमान
होत असेल आपल्यावर अन्याय
उघड्या डोळ्याने पाहू नका
संविधानामुळे मिळाली आहे ताकद
गपगुमान राहून सहन ते करू नका
जोपर्यंत तुम्ही सहन कराल
तोपर्यंत बंधने तुमच्यावर लादतील
दबदबा अपुला वाढविण्यासाठी
ते म्हणतील तसेच वागायला लावतील
येईल कुणीतरी आपल्या मदतीला
या आशेवर राहायचे नाही
नशिबावर दोष देण्यापेक्षा
मनगटावर जोर द्यायचे काही
देवाने तुम्हाला दोन हात -पाय,
आणि डोळे,बुद्धी दिली आहे
कुठपर्यंत गपगुमान राहायचे
बुद्धीचा वापर करायचा आहे
हाडामासांचे ना तुम्ही
सहनशीलतेची काही सिमा असते
समयसुचकतेने योग्य वेळी
प्रतिउत्तर द्यायचे असते
सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया