कळत नकळत..

कळत नकळत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सारे प्रश्न का हळूहळू तू टाळत गेला
किती विचारले पण मौन तू पाळत गेला

पणती बनून आले अगदी तुझ्याजवळ
नी उजेळ मनाचा उगाच तू जाळत गेला

काहूर प्रश्नांचे माजवून गेले तुझे वागणे
भर पावसात आसवांना तू गाळत गेला

नको होता गंध तुला जर त्या मोगऱ्याचा
मग का कळ्या त्या केसांवरती माळत गेला

वाचू शकला नाहीस पुस्तक माझ्या मनाचे
कळत नकळत पान सारे तू चाळत गेला

सारे प्रश्न का हळूहळू तू टाळत गेला
किती विचारले पण मौन तू पाळत गेला

मोहिनी निनावे
आनंद नगर, नागपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles