
मनी माऊ
लातूरला विद्या व कृष्णा यांचे जोडपे राहत होते. त्यांचे नुकतेच लग्न झालेले होते आणि विद्या ही पाच महिन्याची गरोदर होती.
त्यांच्या शेजारचे एक कुटुंब ते गावाला जाणार होते. त्यांना आठ मूलं होती. त्यांना शेवटच्या दोन मुलांचे जावळ करण्याच्या कार्यक्रमासाठी माहेरी जायचे होते. पण मुलांच्या शाळा असल्याने ते एवढ्या सर्व मुलांना घेऊन जाऊ शकत नव्हते. मग विद्याला त्यांनी विचारले की विद्याताई तुम्ही आमच्या मुलांकडे लक्ष द्याल का?.
विद्या आणि कृष्णा या जोडप्याने लगेचच होकार दिला. ते म्हणाले तुम्ही तुमच्या मुलांना आमच्याकडे आणून सोडा. त्यांचा सगळं जबाबदारी आम्ही घेतो तीन-चार दिवस तुम्ही आरामात सगळं करून घ्या. विद्याताईंना त्या शेजारच्या काकू म्हणाल्या की अहो माझी सहा मुलं त्यांचं खाणं पिणं, शाळेची सोय, सर्वच पहावं लागणार आहे तर तुम्ही आमच्याच घरी येऊन राहा.
विद्या आणि कृष्णा या जोडताना त्यांचे म्हणणे आढेवेढे घेत मान्य केले.
शेजारच्या रमा काकू आपल्या मुलांना घेऊन मिस्टरांना घेऊन मुंबई शहराला निघून गेल्या. घरी सहा मुलांसाठी भरपूर अन्नधान्य भरून ठेवले होते. आणि विद्या कृष्णाने जोडपं त्यांच्याकडे जाऊन राहू लागलं.
मुलांना दिवसभर सांभाळलं शाळेतून मुला आले का उपयोगातलं आता रात्रीचे नऊ वाजून गेले होते मुलं त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार अभ्यास करून छान झोपी गेली.
विद्या आहे पाच महिन्याची गरोदर होती. घरातली भांडी घासून वगैरे सगळं दमून ती झोपू लागली.
रात्रीचे जवळ जवळ बारा वाजत आलेले होते. विद्या झोपताच विद्या ला मांजर जिन्यावरून खाली येताना दिसले. आणि त्या मांजराचा आवाज खूपच असा कसा तरी होता की जो ऐकून मनात कसतरी होत होते.
विद्यालय कृष्णाला म्हणजे नवऱ्याला जागे केले. म्हणाली आपण मांजर बघा जुन्यावरून आलाय आणि कसा तरी आवाज करतय.
अर्धा मिनिट गेल्यानंतर ती मुलं ओळी झोपलेली होती सहा मुलं, त्यांच्या अंगावरून ते मांजर जाऊ लागले. आणि माझं त्यांच्या अंगावरून जात होते तर ते मुलांचे आवाज विचित्र आवाज कानी येऊ लागले. बघतोय तर या मुलावरून हे मांजर जात होते तसं तर मांजर आणि मुलं यांचा आवाज बदलत होता.
काही वेळाने हे सर्व थांबले. आता आजा गेल्यावर मांजर आले होते त्या जिल्ह्याच्या वरती ची जागा होती,खोली होती, तिथे विविध विचित्र प्रकारचे आवाज यायला लागले. या आवाजाने विद्या आणि कृष्णा दोघेही घाबरले. एकमेकांचा हात धरून कोपऱ्यात बसून राहिले. जे होतंय ते डोळ्यासमोर बघत राहिले. मुलं खूप उडत होती. विचित्र आवाज करत होती. या सर्वांमुळे विद्या आणि कृष्ण हे जोडपं पूर्ण जागा राहिलं.
साधारण चार-पाच वाजायच्या सुमारास आवाज सर्व बंद झाले. मुलं ती गोळी असल्यासारखी छान छान झोपलेली दिसत होती.
मग पहाटे पहाटे या दोघांचाही डोळा लागला. दुसऱ्या दिवशी सकाळीच विद्याला जेव्हा जाग आली, तेव्हा विद्याने ताबडतोब आपले घर गाठले. कृष्णाला सांगितले या मुलांना आपल्याच घरी घेऊन जावू.
कृष्णाने सर्व मुलांना आपल्या घरी नेले. त्यांची दफ्तरे नेली. पुढील दोन दिवस त्यांनी आपल्या घरामध्ये त्या मुलांना सांभाळले.
ज्या दिवशी त्या मुलांची आई रमा आपल्या घरी आली, तशी ती विद्याच्या घरी ताबडतोब गेली.
विद्याला म्हणाली यावर तुला तर सांगितलं तर माझ्या घरी थांब म्हणून, विद्या मग आता काय ऐकणार होती का?
विद्याने तोंडाचा पट्टा सोडला. तुमच्या घरी पुस्तकाला आहे भुताटकी आहे हे मला न सांगता तुम्ही दोघे निघून गेलात. आज जर का माझ्या पोटातल्या बाळाला काय झाले असते तर, तुम्ही काय केले असते.
रमा खजिल झाली. विदयाची क्षमा मागितली. पण तो भयानक दिवस विद्या कृष्णाने अनुभवला.
ती भूताटकी त्या घरातील काही मंत्र तंत्र याने नंतर घालवली.
वसुधा नाईक, पुणे