
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार आज राज्यपालांना राष्ट्रवादीच्या 30 आमदारांसह पत्र देणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे शपथ घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते 30 आमदारांच्या स्वाक्षऱ्यांच्या पत्रासह राष्ट्रवादीचे नऊ मंत्री देखील शपथ घेतील अशी ही माहिती आहे यासोबतच राजकीय वर्तुळात मागील काही दिवसापासून चर्चेला उधाण आले होते राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे त्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल सुद्धा अजित दादा सोबत असल्याने राष्ट्रवादीत दोन गट पडले असून काही वेळापूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईत होत असलेल्या बैठकीबद्दल काहीही माहित नसल्याचे सुतवाच त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले यावरून राजकीय क्षेत्रात राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई सुळे आणि शरद पवार यामध्ये दोन गट पडल्याचे दिसून येत आहे मागील मागील दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारी अमित शहा व पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांना दिली होती