
निसर्ग प्रवास
निसर्गाच्या सानिध्यात
मनमुराद आनंद लुटावा,
जांभूळ,बोरं अन करवंद
चाखून पहावा राणमेवा.
पाहून थवा पक्षांचा
उडताना आकाशात,
नयनरम्य तों देखावा
साठवून ठेवावा हृदयात.
नदी, नाल्या,ओहोळ
सुमधुर गीत गातात,
आपल्या अस्तित्वाची
चाहूल देवून जातात.
पर्यटनाचा आनंद लुटताना
मैत्री होते रानपाखरांशी,
झाड वेलींच्या छायेत
नाते जडते निसर्गाशी.
इंद्रधनुष्य निळ्या नभीचे
उधळन करीतात रंगाची,
सप्तरंगाचे फुलपाखरू
दिशा बदलते जीवनाची.
लुटू आनंद निसर्गाचा
मनमुराद जगून घेऊ,
कल्पनेच्या हिंदोळ्यावर
वाऱ्या संगे झोके घेऊ,
श्रीमंती,कमल दवंडे
ता. जि. परभणी