
जिल्हा परिषद मोरगाव शाळेत शाळापूर्व तयारी पर्व -२उत्साहात संपन्न
अर्जुनी/मोर: तालुक्यातील नजीकच्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव येथे शाळापूर्व तयारी पर्व २,उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी – शिक्षक-पालक-जनप्रतीनिधी यांचे उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मुनेश्वर शहारे यांचे अध्यक्षतेखाली, पंचायत समिती अर्जुनी/मोर चे गटशिक्षणाधिकारी आर.एल. मांढरे, यांचे हस्ते फीत कापून कार्यक्रमास आरंभ करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधण्यासाठी व दर्जेदार शिक्षणासाठी शिक्षक-पालक-विद्यार्थी-जनप्रतीनिधी याचा समन्वय असणे आवश्यक असल्याचे मत याप्रसंगी व्यक्त केले.
शालेय पूर्वतयारी प्रसंगी जि. प.वरिष्ठ प्राथमिक शाळा, मोरगाव ने केलेले उत्तम नियोजन व जनजागृती याबद्दल समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षांच्या शुभेच्छा दिल्यात.याप्रसंगी शाळेच्या उच्च श्रेणी मुख्याध्यापक रेखा गोंडाने,मोरगाव चे सरपंच गीताताई नेवारे, तंटा मुक्त समिती मोरगाव चे अध्यक्ष तथा ग्रा. प. सदस्य रमेश लाडे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संगीता पुसतोडे, सदस्य तानाजी लोदी,प्रिती लाडे ,अंगणवाडी सेविका शीला लाडे-वासनिक, छाया लोदी,शिक्षक जितेंद्र ठवकर, वामन घरतकर,विलास भैसारे,अचला कापगते,प्राची कागणे व गावातील प्रतिष्ठीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरुषोत्तम गहाणे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार केंद्रप्रमुख सु.मो.भैसारे यांनी केले.