
एच. एम.मेंढे मुख्या.देवलगाव यांचा सेवानिवृत्तिपर सत्कार समारंभ संपन्न
अर्जुनी/ मोर: जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा, देवलगाव येथे कार्यरत असलेले मुख्याध्यापक तथा प्रभारी केंद्रप्रमुख नवेगावबांध यांचे नियत वयोमानाचे ५८वर्षे पूर्ण झाल्याने, त्यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार समारंभ ग्रीन पार्क,राष्ट्रीय उद्यान नवेगावबांध येथे संपन्न झाला.
सदर सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुनी/मोर चे गटशिक्षणाधिकारी आर. एल.मांढरे यांनी मेंढे सरांचे केंद्रप्रमुखाच्या वतीने शाल-श्रीफळ-भेटवस्तू प्रदान करून ,त्यांच्या कार्याचा गौरव केला व पुढील आयुष्य सुखी, समाधानी व आरोग्यदायी लाभावे असे शुभेच्छा व्यक्त केल्यात. तसेच शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बरईकर हे स्थानांतरित झाल्याने त्यांचा सुद्धा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुनी/मोरचे केंद्रप्रमुख सु. मो.भैसारे यांनी केले तर सूत्रसंचालन केंद्रप्रमुख डी.एम.नाकाडे व आभार केंदप्रमुख रमेश संग्रामे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाष्कर लेंढे, भारत बोरकर, ती.के.मस्के,हेमके सर, प्रदीप खोब्रागडे व १३ केंद्रातील संपूर्ण केंद्रप्रमुख यांनी सहकार्य केले.