
ज्ञानदा प्रशाला आणि सरस्वती कॉलेज येथे गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न
अमृता खाकुर्डीकर, पुणे
पुणे: अ.भा.साहित्य परिषद, पुणे यांच्या वतीने ‘ज्ञानदा प्रशाला’ आणि ‘सरस्वती कॉलेज’ येथे गुरुपौर्णिमा उत्सव विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागाने स॔पन्न झाला. अ.भा. साहित्य परिषदेचे अध्यक्ष, प्राचार्य श्याम भुर्के यांनी प्रमुख वक्ता म्हणून विचार मांडताना आपल्या जीवनात गुरुंचे स्थान किती अनन्यसाधारण असते, याबाबत पौराणिक बोधप्रद गोष्टीच्या माध्यमातून मनोर॔जक शैलीत समजावून दिले.
यावेळी ‘भारत विकास परिषद’ यांच्या वतीने विद्यार्थ्यांना ‘पुस्तक भेट’ देण्यात आली. याप्रसंगी अ.भा.साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.चारुदत्त निमकर, ज्ञानदा प्रशालेचे कार्यवाह श्री.मंदार शेंडे, भारत विकास परिषदेचे श्री.मंदार जोग इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ.वाघमारे यांनी केले.
सरस्वती ज्युनियर कॉलेजमध्ये अ.भा.साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते डाॅ.दिलीप कुलकर्णी यांनी गुरुपौर्णिमा उत्सवाचे महत्त्व सांगताना एकाग्रता,सहनशीलता,
संयम,जिद्द, आत्मविश्वास हे गुण विद्यार्थी दशेत मुलांनी स्वतः कसे आत्मसात करावेत याचे मार्गदर्शन केले. अ.भा.साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्ष डॉ. अनुजा कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होत्या. याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ.ढेरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन सौ.सरपोतदार यांनी केले होते.