गुरुवारीय चित्रचारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९३ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*का येत नाहीस?*पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

का येत नाहीस?
किती वाट पाहावी.
नांगरलं शिवार सारं
आता हजेरी लावावी.

*प्राजक्ता आर खांडेकर,नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*कां येत नाहीस…?*

का येत नाहीस?
वाट बघून सुकले डोळे..
बळीराजाच्या हाका ऐक
का घालतोस कानात बोळे..

*प्रतिभा गौपाले,नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*का येत नाहीस*

किती आळवला तुझसाठी मेघ मल्हार
वाट पाहुनी डोळेही थकले
का येत नाहीस पावसा
बळीराजाने शेवटी हातही टेकले

*सौ.ज्योती नवघडे /हजारे*
*ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*चित्र चारोळी– का येत नाहीस*

रोहिणी, मृग, कोरडा गेला
आषाढघनही आता बरसेना
का येत नाहीस पावसा तू
हवालदिल झाला रे बळी तुझ्याविना.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿
*का येत नाहीस..?*

पेरणीची वेळ निघून गेली
एक महिना उशिर झाला
तरीही तू का येत नाहीस..?
कळेल कां रे मेघा आम्हाला..?

*प्रा. दिनकर झाडे, गडचांदूर*
जि. चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*का येत नाहीस?*

धरती आसुसली
बळीराजा वाट पहातोय
का येत नाहीस ?
डोळा अश्रूने वाहतोय

*सौ .कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*का येत नाहीस*

असा कसा रे निष्ठूर झालास
विसरलास का काळ्या आईस?
वाट पाहुनी शिणले डोळे
खरं सांग का येत नाहीस?

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
मुखेड जिल्हा नांदेड
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*का येत नाहीस..?*

किती विनवणी केली
कृपादृष्टी का करत नाहीस…?
दिवस तर तुझेच आहेत की
तरी पावसा का येत नाहीस..?

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*का येत नाहीस*…?

*भेगाळली काळी माय*
*जणू काळीज फाटलं*
*का येत नाहीस राजा*
*बघ डोळ्यात आभाळ दाटलं*…

*सौ.विद्या निनावे*
*नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*शंका येत नाहीस?*

उजाड केलं रान आम्ही
तरी म्हणतो,का येत नाहीस?
राक्षसी भूक मानवाची
संपता संपत नाही

*सौ अर्चना जगदीश मेहेर*
ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*का येत नाहीस*

नांगरून ठेवल शिवार सारं
पेरणीची झाली या वेळ
का येते नाहीस तू
करू नकोस गरिबाचा खेळ

*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*का येत नाहीस?*

वाट पाहून थकले रे डोळे
जीव झालाय कसा कासावीस
मशागतीची निघून गेली घटका
पण पाऊसा तु का येत नाहीस.?

*प्रतिभा खोब्रागडे*
अर्जुनी मोरगाव गोंदिया
*सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*का येत नाहीस…?*

रणरणत्या उन्हात
जीव आला घाईस
जीवन-मरण एकच झालं
सांग ना,का येत नाहीस…?

*सौ.भावना अजय इटकीकर हिंगणघाट जि.वर्धा*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🎗️🔵🎗️♾️♾️♾️♾️
*”का येत नाहीस..? “*

कोणत्या देवाची करू पुजा
की, मी फोडू नारळ देवाले
तु का येत नाहीस..? बाबा,
सांग ना गरीब शेतकऱ्याले

*✍️चंदू डोंगरवार अर्जुनी मोर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह.*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles