दिवसेंदिवस हट्टी झालाय…तू’; स्वाती मराडे

‘दिवसेंदिवस हट्टी झालाय…तू’; स्वाती मराडेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गुरूवारीय स्पर्धेचे काव्यपरीक्षण_

*दरवर्षी ऊनसावलीच्या खेळात.. इंद्रधनूच्या कमानी खालून जाणारी पालखी.. यंदा मात्र गेली धूळ उडवणारे वारे अंगावर घेत.. चटके देणारे ऊन सोसत.‌. क्वचित डोक्यावर धवल ढग यायचे पण कसे गळतील त्यातून टिपूस.. रिमझिमही कुठे झाली नाही. चार थेंब अंगावर पडतील अन् जिवाचा दाह शमवेल असा ढग आभाळात आलाच नाही.. डोळे मात्र पाणावले अन् केली विनवणी त्या पांडुरंगाला.. ती ही हक्काने.*
कमरेवरचे हात काढून आभाळाला लाव
वाट दाखव पावसाला भिजू दे माझा गाव..!
*कोरडे पडलेले झरे तसेच कोरडे आहेत. त्या माळरानाला अजून कुठेच फुटला नाही पाझर. नदीमाय अजूनही शिवाराकडे वळाली नाही. धावण्यासाठी तिच्यात अजून तू त्राणच ओतलं नाही.. ओकेबोके डोंगर अजूनही आहेत काळवंडलेले.. तृणांचा गालिचा त्याला बिलगलाय कुठे.. ना चातकाची तहान भागली ना धरतीच्या उदरी आस जागली.. झाडावेलींच्या अंगावरची धूळही झटकली नाही.. ना वाहणाऱ्या पाण्यात नाचायला मिळालं..ना कागदाच्या होडीने पाण्यावर झुलवलं.. आतुर.. आतुर.. आतुर.. सगळेच आतुर.. सांग ना तू का येत नाहीस?*
तुझ्या आगमनासाठी
आतुर झाला निसर्ग सारा
तू का येत नाहीस
व्याकूळ होऊन विचारे वारा..!
*तुझं येणं म्हणजे चैतन्याचं गाणं.. तुझं येणं म्हणजे आनंदाचं वाण.. तू येताच रानफुले डोलतात.. तू येताच फुलपाखरे भिरभिरतात.. जलधारा पिऊन तृप्त होते रान.. खळखळ वाहणा-या झ-यातून वाहतो जणू प्राण.. तू देतोस धरणीला हिरवाईचा शेला.. भरून आणतो सोबतीला आठवांचा प्याला.. तुझ्या पोतडीतून तू घेऊन येतोस सुखाची हमी.. पण यंदा मात्र या सगळ्यांची अजूनही कमी.. सगळेच हिरमुसलेत.. सगळेच चेहरे सुकलेत.. एकच प्रश्न मनी.. तू का येत नाहीस?*
तू का येत नाहीस ?
की आळवू आता मल्हार
दे संजीवन सृष्टीला
बरसू दे अमृतधार..
*बाकी सगळं ठीक आहे रे.. पण तुला त्या कास्तकाराचीही येत नाही का दया.. किती व्याकूळ होऊन तो तुझी वाट पाहतो. उन्हातान्हात मशागत करून रान तयार करतो. तुझ्यामुळेच तो हिरवं सपान डोळ्यामध्ये रचतो.. पण तू दिवसेंदिवस हट्टी झालाय.. कधी अवकाळी बरसतोस तर कधी वाट पाहून पाहून डोळ्यात पाणी आणतोस. आजच्या चित्र चारोळी स्पर्धेसाठी आलेले चित्र पावसाची व्याकूळ होऊन वाट पाहणा-या शेतकऱ्याचे.‌ हे असं हळवं करणारे चित्र पाहून कवीचं अंतर्मन ढवळून निघतेच. कोरड्या वाहणा-या त्या ढगाला पाहून लेखणी मात्र बरसू लागली.. नाना सवाल त्या पावसाला केले. त्याच्या या हट्टीपणासाठी आपणही जबाबदार ही अंतर्मुख करणारी भावनाही व्यक्त झाली. आजचं तुमचं हे व्यक्त होणं मनस्पर्शीच. असेच लिहीत रहा व्यक्त व्हा या शुभेच्छांसह सर्व सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन 💐*
*आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संंधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार 🙏*

सौ स्वाती मराडे पुणे
मुख्य परीक्षक कवयित्री लेखिका

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles