
शेतमजूर महिलेवर दोघांनी केला बलात्कार
_अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील धक्कादायक प्रकार; दोन्ही आरोपी फरार_
बुलढाणा: जिल्ह्यातील चिखली तालुक्यात एका शेतमजूर महिलेवर दोन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अमडापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात काडी कचरा वेचण्याकरता शेतात गेलेल्या एका शेतमजूर महिलेला जिवे मारण्याची धमकी देत सुधाकर जोशी आणि भानुदास शेजोळ नामक नराधमांनी बळजबरी लैंगिक अत्याचार केला.
यावेळी महिलेने आरडाओरोड केल्याने आरोपी घटनास्थळावर पसार झाले आहे. उशिरा रात्री अमडापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे नराधम सुधाकर जोशी यांनी भानुदास शेजोळ विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून अमडापूर पोलीस कर्मचारी या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.. या धक्कादायक घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.