तिचा भ्रम

तिचा भ्रम



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

बाईपण भारी देवा हा भम्र,
उगाचच पाळून नको बसायला
बाईपण भारी नसत कधीच हे
आता नको वेगळं सांगायला

जिथे पोटाला चिमटा बसतो,
तेव्हा सगळं करायची तयारी होते
बाईतली,आई, बहिण,बायको मग,
देहाने भर बाजारात मलीन होते

स्वतःवर कशी प्रेम करणार ती,
जेव्हा तिच्या भावनांचीच निलामी होते
मान वर करून चालली तरी ती,
सगळ्यांच्या डोळ्यात खुपते

आयुष्याभर ती हा भ्रम उराशी,
बाळगून बसलेली असते
तिच्याशिवाय काही नाही पण,
तिच्या अस्तित्वाची दखल साधी नसते

हाताच्या भेगा आणि मनाच्या यातना,
ती उरात कायम लपवून ठेवते
कोणाला तरी जाणीव होईल ह्याची,
या भ्रमातच ती स्वतःला हरवून बसते

कडू आहे पण तितकंच सत्य आहे,
आजही जाळली जाते लुटली जाते ती
आणि हा भ्रम पाळून बसलोय आपण,
की आता मुक्तपणे वावरते ती.

सविता वामन ठाणे.
=======

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles