बुलढाण्यात मंजूर झालेल्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या नावावरून वाद

बुलढाण्यात मंजूर झालेल्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या नावावरून वाद



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शिवसेना-भाजपाच्या आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई_

बुलढाणा: शासकीय कृषी महाविद्यालयाला माजी कृषिमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाला मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याने भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी मानले सरकारचे आभार. तर माजी कृषिमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाला शिवसेनेचे आ.संजय गायकवाड यांचा विरोध आहे.

राज्य सरकारकडून बुलढाण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या शासकीय कृषी महाविद्यालयाच्या नावावरून बुलढाण्यात शिवसेना आणि भाजपाच्या आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगलीये,शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यात ही श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ,अकोला अंतर्गत बुलढाणा येथे नवीन शासकीय कृषि महाविद्यालय स्थापन करण्याची आणि या शासकीय कृषी महाविद्यालयाला राज्याच्या माजी कृषिमंत्री दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्री मंडळांनी घेतलेल्या निर्णयाचे भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आभार मानले आहे,तर बुलढाणा येथे नवीन शासकीय कृषि महाविद्यालयाला देण्यात आलेल्या माजी कृषिमंत्री दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांचे देण्यात आलेले नावाला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोध दर्शवून या कृषी महाविद्यालयाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णय बदलला लावीन असल्याचे सांगितले आहे.

माझा माजी कृषिमंत्री दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाला विरोध नाही त्यांचा मला आदर आहे,असे आमदार संजय गायकवाड यांनी म्हणत माझ्या मतदारसंघात मी निर्णय घेणार आहे,असेही यावेळी आमदार संजय गायकवाड म्हणालेत आहे.दरम्यान हे शासकीय कृषी महाविद्यालय बुलढाण्यात मीच आणले आहे,असा दावा शिवसेना आणि भाजपचे दोन्ही आजी-माजी आमदार करताहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles