
बलात्कार झालाच नाही, माझी वैद्यकीय तपासणी करू नका; पिडीत तरुणी
_राजूर घाट बलात्कार प्रकरणाला वेगळेच वळण_
बुलडाणा: शहराला लागून असलेल्या राजुर घाटात 35 वर्षीय महिलेवर 8 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा गुन्हा काल रात्री बोराखेडी पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. स्वतः आमदार संजय गायकवाड यांनी 3 तास बोराखेडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडून गुन्हा दाखल करून घेतला होता. हे वृत्त पसरतात संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती.
मात्र या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे,या प्रकरणात पीडित महिलेऐवजी तिच्यासोबत असलेल्या नातेवाईक पुरुषाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र माझ्यावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नाही, आरोपींनी आमच्याकडील पैसे, मोबाईल नेले, आमचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची व समाजात बदनामी करण्याची धमकी दिली व आरोपी तिथून निघून गेले असे पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या बयानात सांगितले.
लैंगिक अत्याचार झालेलाच नाही त्यामुळे माझ्या वैद्यकीय तपासणीची गरज नाही असेही पिडीतीने पोलिसांना लिहून दिले आहे.सध्या पाच आरोपी पोलिसांनी अटक केली आहे.