
जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाने ध्येयापर्यंत पोहोचता येते’; पल्लवी आखरे
पुसद- नुकताच दि.१० जुलै 23 ला गांधीनगर पत्रे लेआउट, संकट मोचन मंदिर परीसर गार्डन येथे श्री सुभाष चंद्र बोस बचत गट व द ग्रेट योगा वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रदीप जयस्वाल यांचे अध्यक्षते खाली करण्यात आले होते .
प्रमुख अतिथी म्हणून पुसद शहराचे नवनीयुक्त तहसीलदार मॅडम कु.पल्लवी आखरें व प्रा.डाॅ. सौ. स्वाती वाट या उपस्थित होत्या. श्री सुभाष चंद्र बोस बचत गटाचे अध्यक्ष प्रा. डॉ. केशव चेटूले सक्रिय सदस्य श्री अनिल विरखडे सर, श्री.एस के. जाधव साहेब, श्री प्रकाश भाऊ चौधरी यांच्या अथक परिश्रमांमधून व कल्पकतेमधून या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे केंद्रबिंदू कु.पल्लवी आखरे( मॅडम नवनियुक्त तहसीलदार पुसद ) यांचा सत्कार प्रा. डॉ. केशव चेटूले यांच्या हस्ते करण्यांत आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्रदीप जयस्वाल यांचा सत्कार श्री निलकंठ घाडगे यांच्या हस्ते करण्यात आला तसेच दुसरे प्रमुख पाहुणे सौ.डाॅ. स्वाती वाट यांचा सत्कार उपमुख्याध्यापक श्री अशोकराव देशमुख व त्यांच्या अर्धांगिनी माजी.मुख्याध्यापीका सौ.निताताई देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
त्याचप्रमाणे परिसरामध्ये मागील सात महिन्यापासून नियमीत योग वर्ग घेणारे योगशिक्षक श्री कैलास भांगे यांचा सुद्धा सत्कार तहसीलदार कु. पल्लवी आखरे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. परिसरातील ज्या गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुणवत्ता/यश प्राप्त केले त्यांचा अभिनंदन व सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यामध्ये पाहुण्यांचे हस्ते खालील विद्यार्थ्यांचा त्यांचे पालका सह शाल, श्रीफळ मिठाई भरून सत्कार करण्यात आला.
1)कु.अश्विनी सुधाकर जाधव (बचाटे) ( म्हाडा मध्ये नौकरी)
2.) डॉ. आदित्य सुशांतभाउ महल्ले(वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती )
3.)डॉ. अजिंक्य अनिल विरखेडे(MBBS उत्तीर्ण )
4.)चि. अंशुल कृष्णराव. देशमुख (नीट उत्तीर्ण)
5.)चि.सौरभ केशवराव चेटुले (सेट उत्तीर्ण)
6)चि. हर्षल प्रकाशराव चौधरी (नौकरी नियुक्ती )
7)चि.अंकित गणेश शिन्दे (नौकरी) इत्यादी
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणाऱ्या पुसद शहराचे नवनियुक्त तहसीलदार कु.पल्लवी आखरे मॅडम यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर, स्वअनुभवावर आधारित मार्गदर्शन केले.त्यांनी स्वतःचे उदाहरण दिले की, इंजिनिअरिंगची डिग्री असतांना सुद्धा त्या आर्ट्स शी संबंधित असणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये कशाप्रकारे यश संपादन केले व परिश्रमाने कसे त्यांना ते शक्य झाले या बाबत मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे परिसरातील अत्यंत उत्कृष्ट लोकसहभागातुन तयार केलेले गार्डन बघुन त्यांनी डॉ. केशव चेटुले सर व त्यांचा संपूर्ण टीम चे कौतुक केले.व प्रतेक वार्डात कमीत कमी एक शिक्षक प्राध्यापक जरुर असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. दुसरे प्रमुख पाहुणे प्रा.डाॅ. सौ. स्वाती वाट यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना व पालकांना प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले,या वेळी त्यांचाही पी एच डी मीळविल्या बद्दल सत्कार करण्यात आला व योगा ग्रुप चे सदस्य श्री दिलीप गुप्ता यांचा सेवानिवृत्तीनिमित्त पल्लवी आखरे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी अशा प्रकारचे अनेक समाजोपयोगी उपक्रम एकत्र येऊन राबविण्यात येतअसल्याबद्दल कौतुक केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणा मधून प्रा. प्रदीप जयस्वाल यांनी परिसरातील प्रत्येक महिला व पुरुष कशा प्रकारे या सामाजिक उपक्रमा मध्ये हिरारीने भाग घेतो हे सांगितले. याच मैदान व व गार्डन ने आम्हाला कशा प्रकारा एकत्र आणले या बाबत माहिती दिली. अनेक कार्यक्रम भविष्यामध्ये सुद्धा असेच अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तविक माजी उपमुख्याध्यापक श्री अशोकराव देशमुख यांनी केले.त्यांनी परीसर विकासात नागरीकांचे योगदान व सहभाग या बाबत माहिती सांगितली तर आभार प्रदर्शन श्री. चंद्रकांत ठेंगे सर यांनी केले. कार्यक्रमाचे पुर्वी सौ.निरुपमा प्रकाश चौधरी मॅडम यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त गार्डन मध्ये वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला.
वरील कार्यक्रमाला परिसरातील बहुतांश महिला,पुरुष व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे शेवटी फराळ चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यकुशल,
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आयोजन समीतीचे श्री. अनिल वीरखडे सर, श्री.प्रकाश चौधरी , श्री अशोकराव देशमुख , श्री निलकंठ घाडगे पाटील , श्री.शिवाजी मारकड, श्री.एस के जाधव व सदस्यांनी परीश्रम घेतले.