दीपपूजन आणि श्रावणी अधिकमास

दीपपूजन आणि श्रावणी अधिकमासपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अमृता खाकुर्डीकर, पुणे (प्रतिनिधी)

पुणे: आषाढ महिन्यातील अखेरचा दिवस “दीप अमावास्या” म्हणून साजरा करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे.रोज प्रकाश देण्याचं काम अविरतपणे करणा-या दिव्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची ही प्रथा आहे. यानुसार श्रध्दाभावनेतून दिव्यांचा मान-सन्मान करण्यासाठी आजचा दिवस दिव्यांना विश्रांती दिली जाते. त्यांना घासून-पुसून स्वच्छ करून त्यांचे पूजन करतात.

आताच्या काळात आपल्याला दिवस-रात्र प्रकाश देणारे विजेचे दिवे दिमतीला असले तरी; आजही आपण देवघरातली समयी, तुळशी वृंदावनातील दिवली, औक्षणाच्या तबकातील निरांजन, देवाची आरती करताना वापरला जाणारी पंचारती, कापूर आरती आणि येणा-या जाणा-यांना उजेड दाखवणारा लाम्हणदिवा, असे पितळी, तांब्याचे किंवा चा॔दीचे दिवे प्रत्येकाच्या घरात असतात.

यावेळच्या दीप आमावस्येचे महत्वं आजुनच खास आहे. श्रावण महिना यावेळी अधिक मास म्हणून येत असल्याने ही अधिक अमावास्या आहे, शिवाय सोमवारी येत असल्याने हिला सोमवती आमावस्या म्हणतात. शक संवत नुसार प्रत्येक अमावास्येनंतर नवीन महिन्याची सुरुवात होते. त्याप्रमाणे आषाढ़ संपून दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरु होतो. कालगणनेतील फिरत्या चक्रगतीमध्ये होणा-या फराकाने जास्तीचे मोजले जाणारे दिवस “अधिक मास” म्हणून गणले जातात. या वेळी अधिक मास हा श्रावणाच्या जागी आल्याने यास श्रावण अधिक मास म्हटले जात आहे.

“सोमवती अमावस्येचे आपल्याकडे आगळे वेगळे महत्त्वं आहे. “ संस्कृत मध्ये “सोम” म्हणजे चंद्र. चंद्राचा वार, तो सोमवार. अमावस्येला चंद्र सूर्य एकाच राशीत असतात. आजच्या स्थितीनुसार चंद्र-सूर्य कर्क राशीत आहेत.

भारतीय पंचांगाप्रमाणे श्रावण व भाद्रपद हे पावसाचे महिने आहेत. आषाढानंतर येणारा श्रावण महिना हा रिमझिम पाऊस आणि अनेक सणवार घेऊन येतो. आषाढी एकादशीपासून सुरू झालेला चातुर्मास कार्तिकी एकादशीपर्यंत पाळला जातो. या सर्व कालावधी धार्मिक महात्म्य आणि सणांवारांचा असतो. भाद्रपदात गौरी – गणपती अश्विन,कार्तिकात दिवाळी – दसरा, असे सणवार समारंभपूर्वक साजरे होतात तसेच व्रतवैकल्ये आणि उपवास याला चातुर्मासात खूप महत्वं आहे.

या उपासनेच्या धार्मिक कार्यक्रमात अर्थात घरातील दिव्यांचेही खूप महत्व आहे. श्रावणापूर्वीची तयारी म्हणून आषाढी अमावास्येला घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता व पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. धर्म परंपरेत इतक्या सुंदर उद्देशाने सुरू झालेली ही दीप पूजनाची आषाढ आमावस्या; पण दुर्दैवाने या अमावास्येला “गटार” आमावस्या म्हणण्याची कुप्रथा कशी आणि कधी पडली, याचे दाखले मात्र ईतिहासात मिळत नाहीत. अर्थात कधी कुणी काय खावे प्यावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

परंतु आपण आपल्या सणांचे मागचे सखोल अर्थ, त्यापाठीमागे असलेली वैज्ञानिक दृष्टी, आनंदाने समारंभ साजरे करण्यामागे असणारी मनोवैज्ञानिक कारणे हे सर्व समजून घेतले तर आपला आनंद सार्थ होईल आणि त्या रूढी-प्रथांचे पावित्र्यही राखले जाईल. म्हणून याची सुरूवात स्वतःपासून करून आवर्जुन “दिव्याची अमावस्या” असेच म्हणू. सोशल मिडियावर चालणा-या गंमतीजंमती सोडून चुकीच्या नावाने उल्लेख करणे टाळायला हवे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles