
‘भाविसाचा उपक्रमःपुस्तके आपल्या दारी’; एक विचारयात्रा
अमृता खाकुर्डीकर,पुणे प्रतिनिधी
पुणे: राष्ट्रीय विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने प्रबोधनपर पुस्तकांचे प्रकाशन व विक्री करणारे भारतीय विचार साधना फाऊंडेशन यांनी आयोजित केलेल्या “पुस्तके आपल्या दारी” या उपक्रमासाठी “विचारयात्रा रथ” तयार केला असून त्यामध्ये राष्ट्रीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, महिलाविषयक, ऐतिहासिक, अशा विविध विषयांच्या पुस्तिका आणि थोर महापुरुषांची चरित्रे ठेवण्यात येत आहेत.
विविध शहरात साहित्य संमेलने, व्याख्यानमाला, जत्रा/यात्रा असे कार्यक्रम साजरे होत असतात. अशा प्रसंगी या “विचारयात्रा रथा”चा उपयोग करून रसिक वाचक, तसेच शालेय विद्यार्थी, लहान मुले यांना पुस्तके उपलब्ध होऊ शकतील.