मनाची अवस्था;डॉ ज्ञानेश्वर माशाळकर

मनाची अवस्थापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

एकदा धनाढ्य व्यक्तीने एका गुरुजींना जेवणासाठी निमंत्रित केले. परंतु एकादशीचा उपवास होता, म्हणून गुरुजी जाऊ शकले नाहीत. गुरुजींनी आपल्या दोन शिष्यांना त्या व्यक्तीकडे भोजनासाठी पाठवून दिले. परंतु जेव्हा दोन शिष्य परत आले. तेव्हा त्यातला एक शिष्य दुःखी आणि दुसरा प्रसन्न होता. गुरुजींना आश्चर्य वाटले. म्हणून गुरुजींनी एकास विचारले, “बाळा तू दुःखी का आहेस? मालकाने भोजनात काही फरक केला का”? “नाही गुरुजी” मालकाने बसण्यात फरक केला का? “नाही गुरुजी” दक्षिणेमध्ये फरक केला का? “नाही गुरुजी” दक्षिणा बरोबर २ रुपये “मला आणि २ रुपये दुसऱ्याला” दिली. आता तर गुरुजींना अजूनच आश्चर्य वाटले आणि त्यांनी विचारले, मग कारण काय आहे? जो तू दुःखी आहेस? तेव्हा दुःखी शिष्य बोलला, “गुरुजी, मी तर विचार करायचो की, ती व्यक्ती खूप श्रीमंत आहे. कमीत कमी १० रुपये दक्षिणा देईल. परंतु त्यांनी २ रुपये दिले म्हणून मी दुःखी आहे.

गुरुजींनी दुसऱ्याला विचारले तू का प्रसन्न आहेस? तेव्हा तो म्हणाला, गुरुजी मला माहीत होते की, ती धनाढ्य व्यक्ती खूप कंजूष आहे. आठाण्यापेक्षा जास्त दक्षिणा देणार नाही. परंतु त्यांनी २ रुपये दिले, म्हणून मी प्रसन्न आहे. हीच आपल्या मनाची अवस्था आहे. संसारात घटना या समानरुपी घडतात. परंतु कोणी त्या घटनांद्वारे सुख प्राप्त करतात. तर कोणी दुःखी होते. परंतु खरंतर दुःख अथवा सुख, हे आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. म्हणून मन प्रभुच्या चरणाशी जोडून असूद्या. इच्छा पूर्ण झाली नाही, तर दुःख आणि इच्छा पूर्ण झाली, तर सुख, परंतु जर कोणती इच्छाच नसेल, तर आनंद. ज्या शरीराला लोक सुंदर समजतात, मेल्यानंतर तेच शरीर सुंदर का वाटत नाही? त्याला घरी न ठेवता जाळून का टाकतात? ज्या शरीराला सुंदर मानतात, फक्त त्याची त्वचा काढून टाका. तेव्हा वास्तव दिसेल की, आत काय आहे? आत फक्त रक्त, रोग, मळ आणि कचरा भरलेला आहे. मग हे शरीर सुंदर कसंअसेल?

शरीरात कोणतीही सुंदरता नाही. तर सुंदर असतात ते व्यक्तिचे कर्म, त्याचे विचार, त्याची वाणी, त्याची वागणूक, त्याचे संस्कार आणि त्याचे चारित्र्य! ज्याच्या जीवनात हे सर्व आहे, तीच व्यक्ती जगातली सर्वात सुंदर व्यक्ती आहे. दुधाला दुःख दिले की, दही बनते. दह्याला दुखावले की, ताक बनते. ताकाला त्रास दिला, तर लोणी बनते आणि लोण्याला लोळवले तर तूप बनते. दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा ताक महाग, ताकापेक्षा लोणी महाग, लोण्यापेक्षा तूप महाग. परंतु या सर्वांचा रंग एकच, तो म्हणजे शुभ्र.

याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही, अशा माणसाची समाजातील किंमत जास्त असते. दूध उपयोगी आहे, पण ते एक दिवसात नासते. दुधाचे विरजण, दही दोन दिवस टिकेल. दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे दिवस तीन. ताकामधले लोणी आठवडाभर राहील. पण लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही. आता बघा आहे की नाही गंमत. एका दिवसातच नासणाऱ्या दुधात कधीही न नासणारे तूप लपले आहे. तसेच आपले मन अथांग आहे. त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा, चिंतन करा, मनन करा. आपले जीवन तावून सुलाखून घेतलेले आणि त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही, म्हणजेच कधीही न हरणारे एक सदाबहार व्यक्तिमत्त्व. मग निष्कारण घाबरायचे कशाला? फक्त एवढेच करा की, आपल्या चंचल मनाला सावरा आणि आवरा..!!

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर गुरुजी
भारत विद्यालय बेडगा
ता. उमरगा, जि उस्मानाबाद

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles