
युक्तिवाद
युक्तिवाद हा खुर्चीचा
भंपकपणाला येई ऊत
सत्ताधारी नि विरोधी
लुटती रे जुळवून सूत
युक्तिवाद हा खुर्चीचा
लोकशाहीचा तमाशा
बेगडीपणा हा सेवेचा
पदरी सारी रे निराशा
युक्तिवाद हा खुर्चीचा
जनमताचा पाहून कल
राजकारणी सारे एक
नौटंकीने करतात खल
युक्तिवाद हा खुर्चीचा
लोकशाहीला भगदाड
नियम सारे पायदळी
टाकती रे दिवसा धाड
युक्तिवाद हा खुर्चीचा
जनकल्याणार्थ असावा
ढोंगीपणा पडेल उघडा
बुडबुड्यावाणी रे नसावा
संग्राम कुमठेकर
ता.अहमदपूर जि.लातूर