
येता जाता
येता जाता शब्द नी शब्द
काव्याचे मी टिपत जाते
काव्यात ओतून शब्द
काव्य निर्मिती करते ॥१॥
विखरूलेले शब्द वेचून
भाव उतरे लेखणीतून
येता जाता काव्य जन्मून
जाते मनाला ते आनंदून ॥२॥
शब्द शब्द साठवताना
जाई वेचण्यात थोडा वेळ
बुध्दीला मिळुन चालना
काव्य निर्मितीचा चाले खेळ ॥३॥
मनी भावना ओथंबून
शब्द येती ओठी हळुवार
भान माझे हरपून
झणी उतरती कागदावर ॥४॥
अलगद शब्द झेलतांना
मनी काव्यधारा प्रसवे
अलवार येता जाताना
मन काव्याने सुखावे ॥५॥
नीला पाटणकर,शिकागो.
==========