
अक्षरयात्रा
अ आ इ ई
गिरवू अक्षर
घेऊनी आधार
बनूया साक्षर ||१||
अक्षरांचे मोल
जीवनात खूप
दाखवी सर्वांना
नवे हे स्वरूप ||२||
लिहिता वाचता
वाढे मनोबल
हळूहळू होई
साऱ्याची उकल ||३||
गुरूजी शिकवी
स्वर नि व्यंजन
अक्षरांचे मनी
होतसे गुंजन ||४||
एक दोन तीन
संख्या या वाचतो
नवा दृष्टिकोन
सदैव असतो ||५||
गुरूजी देतील
सुंदर आकार
विद्यार्थ्यांचे स्वप्न
करती साकार ||६||
ही अक्षरयात्रा
होई अशी पूर्ण
गुरूजींची साथ
लाभे परिपूर्ण ||७||
विनायक कृष्णराव पाटील बेळगाव
=====