
समाजात एकता हवीच…
भीमसैनिक आम्ही समाजात एकजुटीने राहू
बाभिमाचा अर्ध्यात ठेवलेला रथ पुढे पुढे नेऊ…
तळागळातील जनतेसाठी तो लढला
पण कुणापुढीही नाही तो झुकला
या भिमसैनिकांनो भिमज्योत अखंड तेवत ठेवू…
भिमबाबा वाघाची रे आम्ही हो छावे
नका करू रे हेवेदावे
या भिमसैनिकांनो समाजाची धुरा ती खांद्यांवर घेऊ…
समाजातील जनतेत पाडली ती फुट
एकीची बांधून गाठ दावण्या तयाना वाट
या भिमसैनिकांनो क्रांतीची मशाल हाती घेऊ..
संविधानाने दिला आहे आम्हा अधिकार
होताच अन्याय एकजुटीने करू प्रतिकार
या भिमसैनिकांनो ललकारी ती देऊ…
या निळ्या झेंड्याखाली चला एक होऊ सारे
भिमसैनिकांनो बाभिमाचा धम्मरथ हा पुढे पुढे नेऊ…
सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया