
समायोजन
पक्ष बदलतात वेळोवेळी
झगडतात सारे खुर्चीसाठी
शुभ्र वस्त्रधारी पुढाऱ्यांची
मनमानी चाले सत्तेसाठी
फुकटाची शान मारून
मिरवतात नेते स्वतःला
लोकशाही धोक्यात आणून
फसवतात सामान्य जनतेला
मानमर्याद सोडून सारी
विरोधी पक्ष जवळ करतात
जनतेचे हित बाजूला सारून
आपलाच स्वार्थ साधतात
सत्ता बदलताच विस्कटते घडी
समायोजन करण्या काळ लोटतो
माजवून इथे मग हुकुमशाही
आम्ही जनतेसाठीच म्हणतो
प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह
======