RTE अंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण मोफतच द्या, तरुणाची सायकलनं मुंबई वारी

RTE अंतर्गत बारावी पर्यंत शिक्षण मोफतच द्या, तरुणाची सायकलनं मुंबई वारीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सोलापूरहून सायकलने मुंबईकडे निघताना रॉबर्ट गॉडर, सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार_

सोलापूर: मोफत शिक्षणाचा अधिकारी अंतर्गत आरटीई बारावी पर्यंत मोफत शिक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य व्हावी यासाठी एक तरुण सोलापूर ते मुंबई सायकल वरून प्रवास करत आहे.

रॉबर्ट गौडर हे सोलापूरहून मुंबईच्या दिशेने निघाले असून गौडर हे पालक संघटनेचे अध्यक्ष आहेत. २१ जुलै रोजी ते मुंबईत पोहोचतील. तिथे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांना भेटणार आहेत.

सध्या कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. त्यानुसार हे शिक्षण फक्त आठवीपर्यंत आहे. आठवीनंतर आपल्या मुलांना खासगी शाळेत शिकविणे पालकांना आर्थिक अडचणीचे ठरते. यामुळे अनेक पालक मुलांची शाळा बदलतात किंवा शाळेतन काढून टाकतात. या विद्यार्थ्यांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. यावर उपाय म्हणून RTE अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना आठवी पर्यंतच्या शिक्षणा ऐवजी बारावी पर्यंतची अट करावी या मागणीसाठी सोलापूर ते मुंबई सायकलवर निघालो अशी माहिती रॉबर्ट गौडर यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles