
मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यात , रस्त्याची चाळण, रुग्ण, गर्भवती महिला प्रवाशी जनतेचे अतोनात हाल
मुंबई: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापुर या ८४ किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 13 वर्षापासून रेंगाळत सुरु असल्याने मार्गाच्या दुरावस्थेने प्रवाशी जनतेचे प्रचंड हाल होत आहेत.
आता पावसाळयात महामार्गावर मोठं मोठे असे खोल जीवघेणे खड्डे पडलेले दिसतात, मात्र सरकार व प्रशासन निद्रावस्थेत आहे, राजकीय सभात व एकमेकांची उणिधुनी काढण्यात व्यस्त आहे ही मोठी शोकांतिका आहे, रस्त्याची दयनीय अवस्था व एखाद्या मोजपट्टीत ही मावेनात इतके मोठे खड्डे पडल्याने प्रवाशी जनता जिव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. या मार्गावर अनेक जीवघेणे अपघात होऊन निष्पाप जीवांचा बळी जातोय, सरकारला जाग कधी येणार? असा सवाल जनतेतून विचारला जातोय.