
सेंचुरी सायन्स इन्स्टिट्यूटच्या वतीने २३ जुलै ला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व करियर मार्गदर्शन
नागपूर: दक्षिण नागपुरातील हुडकेश्वर रोड आशीर्वाद नगर चौक येथील नुकत्याच झालेल्या इयत्ता १० वी १२ वीच्या परीक्षेत सेंचुरी सायन्स इन्स्टिट्यूटच्या अनेक विद्यार्थांना घवघवीत यश मिळाले. या विद्यार्थ्यांची कायम अशीच प्रगती होवो व त्यांना पुढेही असेच यश मिळावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे अतिशय आवश्यक आहे.
सध्याच्या एकंदरीत शैक्षणिक शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण होतो व यामुळे त्यांचे करियरचे निर्णय चुकतात, एकदा दिशाभूल झाली की नंतर त्यातून बाहेर पडतांना त्यांना व त्यांच्या पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.
ही संपूर्ण परिस्थिती समजून घेता विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांची दिशाभूल होणे टाळता येईल, तसेच त्यांना त्यांचे ध्येय निश्चित करण्यासही मदत मिळेल म्हणूनच रविवार २३ जुलै रोजी दुपारी १.०० वाजता सुरेशभट सभागृह, रेशिमबाग, नागपूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा तसेच करियर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार असतील, तसेच प्रमुख अतिथी म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी विपीन इटनकर विधान परिषद आ.ॲड. अभिजित वंजारी प्रियदर्शिनी ग्रुपचे इंजिनियरिंग विभागाचे संचालक डॉ.विवेक नानोटी, AIIMS नागपूरच्या अधिष्ठाता डॉ.मृणाल फाटक तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहतील. यावेळी गुणवंत विद्यार्थांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल.
तसेच विद्यार्थांना त्यांचे अमूल्य मार्गदर्शन ही मिळेल. असे पत्र परिषद मध्ये संचालिका मेघना योगेश मार्चंटवार यांनी पत्रकारांना सांगितले. यावेळी शाखा व्यवस्थापक निखिल मार्गमवार तसेच मार्गदर्शक प्रा. योगेश मार्चंटवार उपस्थित होते.