सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांना लागली गळती

सोयगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांना लागली गळती



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_निंबायती तांडा व बहुलखेडा येथील शाळेतील वर्ग खोल्यांत पाणीच-पाणी_

_विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून द्यावे लागते शिक्षण_

संभाजीनगर: सोयगाव तालुक्यात मंगळवार रात्री पासून सुरू असलेल्या पावसाने जिल्हा परिषद शाळेच्या अर्ध्याहून जास्त गळती लागल्याचा प्रकार निंबायती व बहुलखेडा येथील शाळेत घडला आहे याठिकाणी विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत, तालुक्यातील निंबायतीसह इतर शाळेच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्या पावसामुळे पडतात की अशी परिस्थिती झाली आहे तर त्यावर असलेल्या पत्रांची चाळणी झाली आहे.

निंबायती येथील ग्रामस्थांनी याविषयी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या कडे याविषयी लेखी पत्रकाद्वारे सांगितले मात्र अद्यापही जिल्हा परिषदेला जाग आलेली नसल्याने पडक्या व जीर्ण झालेल्या गळती लागलेल्या वर्ग खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे

निंबायती तांडा येथील जिल्हा परिषद शाळा येथे एकूण 12 वर्गखोल्या आहेत त्यापैकी 4 खोल्या बऱ्यापैकी आहे आणि आठ खोल्या या जीर्ण अवस्थेत असून त्यांना पावसामुळे गळती लागली आहे तर खोल्यांचा काही भाग ढासळून पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles