
लाल नाला प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान
_या प्रकल्पातून सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी_
_शेत जमिनीवरील पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हवालदिल_
_लाल लाल या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न ऐरणीवर_
वर्धा: जिल्ह्यातील लाल लाल नाला प्रकल्पाच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे काल रात्री या प्रकल्पाचे पाच दरवाजे 05 सेंटीमीटरने उघडण्यात आले होते पाण्याचा विसर्ग 12.12 किलोमीटर प्रति सेकंदाने करण्यात आला. या लाल नाला प्रकल्पाच्या बाजूच्या असलेल्या गावांमधील शेतीला मोठ्या प्रमाणात या पुराचा फटका बसला.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताला सकाळी तळ्याचे स्वरूप आले होते नुकतीच उगवलेली पिके पाण्याखाली गेल्याने शेतकरी हा हवालदिलं झाला आहे.
व्हॉइस ओव्हर- लाल नाला प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे नेहमीच प्रकल्पालगत असलेल्या शेत जमिनीला या पाण्याचा फटका बसतो जवळपास 35 ते 40 गावांना या पुराचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होते. पार्डी, हेटीसावंगी चीजघाट लाडकी मानोरा, काजळसरा, सेलू ,कोरा, नंदुरी यासह अनेक गावांना या पुराच्या पाण्याचा फटका बसतो.
हिवाळ्यामध्ये रब्बी पिकाला या लाल लाल या प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळत नाही परंतु खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात या नाल्यातील विसर्ग केलेला पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होते. आमदार समीर कुनावार व खासदार रामदास तडस यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. लाल नाला प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे असे शेतकरी राहुल भोयर यांनी बोलून दाखविले.