
चोपड्यात वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावे व जैन मुनिची हत्या करणाऱ्यावर कडक कारवाईसाठी आंदोलन
जळगाव: लँड जिहाद करणारा वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा व कर्नाटक राज्यात जैन मुनीची हत्या करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर हिंदुत्ववादी संघटना व हिंदुत्ववादी पक्ष व व्यापाऱ्यांनी आंदोलन केलं यावेळी वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्यात यावा व कर्नाटक राज्यात जैन मुनि ची हत्या करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात यावी असे घोषणा देण्यात आले.
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले यावेळी यशवंत चौधरी अनिल वानखेडे आबा देशमुख अमृत भाई सचदेव गजेंद्र जयस्वाल ऍड धर्मेंद्र सोनार सुनील बडिया यांच्यासह मोठ्या संख्यांमध्ये हिंदुत्व वादी संघटनेचे पदाधिकारी व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.