
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध ९५ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे. नसेल पाठवायचे तर नकार तरी द्यावा*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*काय सांगू मी?*
काय सांगू मी आता
माझ्या आयुष्याच्या कथा.
भंगार गोळा करूनी
मांडतो जीवनाच्या व्यथा.
*प्राजक्ता आर खांडेकर,नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌸💚🌸♾️♾️♾️♾️
*काय सांगू मी ?*
काय सांगू मी? तुम्हा
कसा भार वाहतो
दोन वेळच्या पोटासाठी
सारी कसरत करतो
*विनायक कृष्णराव पाटील बेळगाव*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️🌸💚🌸♾️♾️♾️♾️
*🚩कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे. विजेत्यांनी कधीतरी निवडलेली रचना साप्ताहिकासाठी पाठवावी (सूचना काळजीपूर्वक वाचावी. ३१ मार्च रोजी वार्षिक सभासदत्व संपलेल्या सदस्यांनी पुनर्नोंदणी करावी)*
➿➿➿➿🦋💟🦋➿➿➿ह
*काय सांगू मी?*
काय सांगू मी?
माझा रोजचा प्रवास
तुझ्यावीना चालताना
फुलून येतो श्वास
*सौ.भावना अजय इटकीकर*
*हिंगणघाट जि.वर्धा*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌸💚🌸♾️♾️♾️♾️
*काय सांगू मी?*
काय सांगू मी? व्यथा
हालपेष्टेत मी जगतो
हातावरचे पोट माझे
कष्टाचा भार हा पेलतो
*सौ.प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌸💚🌸♾️♾️♾️♾️
*काय सांगू मी ?*
काय सांगू तुला ? मी
आपल्या जिवनाची व्यथा
हे तर रोजचेच असते
दुःखाने भरली कथा
*केवलचंद शहारे*
सौंदड गोंदिया
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌸💚🌸♾️♾️♾️♾️
*काय सांगू मी?*
अखंड वाहतो भार मी अंगा खांद्यावरी
पायांना लावून चाकं फिरतो दारोदारी
काय सांगू मी? माझी व्यथा परोपरी
अन कशी पुरी करू ही आयुष्यवारी
*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*