“आयुष्याच्या चित्रसावल्यांत रंग भरू या आशेचे”; वैशाली अंड्रस्कर

“आयुष्याच्या चित्रसावल्यांत रंग भरू या आशेचे”; वैशाली अंड्रस्करपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धेचे परीक्षण

*तप्त उन्हाच्या झळांमध्ये*
*तू चित्रसावली होऊनी यावे*
*अंधारलेल्या गूढ वाटांवर*
*मी गीत शुभ्र तारकांचे गावे*

तरल मनाला अलवार झुलवणाऱ्या प्रीतीला सावलीचे नेहमीच अप्रूप. ती सावली कधी असेल मातापित्यांच्या प्रेमाची, तारुण्याच्या उंबरठ्यावर सख्या सोबत्यांची, प्रौढपणात सहचराची, वृद्धत्वात लेकरांच्या कर्तव्यदक्ष सहानुभूतीची…ही प्रेमळ सावली ज्यांना लाभली ते खरंच धन्य होत.

पण ही सावली ज्यांना नाही मिळाली त्यांनी काय झुरतच मरायचं…? कधीच नाही… माणसाचं आयुष्य एकच आहे पण जगण्याचे कंगोरे अनेक आहेत. या कंगोऱ्यांच्या अनेक चित्राकृती आपल्या आयुष्यात फेर धरून नाचत असतात. त्या चित्राकृतींच्या सावल्या आपल्याला कधी भिववित असतात.

पण घाबरणे म्हणजे जगणे नव्हे…काट्यांची तुडवून वाट चढेन सुखदुःखाचे घाट…गाठेन तव क्षितिजाला…रवीराज असेल माझ्या सोबतीला…ही जिद्द ही चिकाटी त्या चित्रसावल्यांमध्ये रंग भरेल. सप्तरंगाचे इंद्रधनुष्य मग आयुष्यात फुलेल. ही चित्रसावली आज मराठीचे शिलेदार समूहात ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेच्या निमित्ताने विषय म्हणून आली तेव्हा काहीतरी गूढ असावे असे वाटले पण जेव्हा शब्दसावलीच्या कडेकडेने चालायला लागले…तसेतसे चित्रसावलीचे रंगही उमगू लागले.

समूहात सुद्धा शिलेदारांनी अप्रतिम चित्रसावली पसरलीय….शब्दसावल्यांच्या या खेळात आई पत्नी आप्त यांच्या चित्रसावल्यांचे सुंदर वर्णन सर्वांनी केले. काहींच्या लेखणीने डोळ्यांत पाणी आणले…जसे वाशीमहून चारू झरे लिहितात…

*राया तुमची चित्रसावली*
*आधारवड जीवाचा होते*
*नसतानाही सोबत तुम्ही*
*लेकरांना आशीर्वाद देते…*

अशाप्रकारे सर्वांनीच चित्रसावलीत रंग भरून विषयाला न्याय दिला…सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि भावी लेखणीस भरभरून शुभेच्छा… एका नाजूकसाजूक विषयावर मला परीक्षणाच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्दल माननीय राहुलदादा पाटील यांचे मनापासून आभार….!

सौ.वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
कवयित्री/लेखिका
सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles