माझ्या शाळेची वाट;संजय गायकवाड

माझ्या शाळेची वाट



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

आठवते मला आजही
माझ्या शाळेची वाट
रंगबेरंगी फुलांनी
सजलेला तिचा तो थाट

आठवतात मला
त्या बालपणीच्या आठवणी
स्वच्छंद फुलपाखरासारख
उड्या मारत गुणगुनायचो गाणी

शाळेच्या वाटेवर
तो फुलाचा सुगंध
निरागस मन
त्यातच असायचं बेधुंद

मित्रांचा तो गोड सहवास
मन भरून खेळायचे तासन्तास
नसायचे कसलेच भान
असो उन वारा थंडी पाऊस

कित्येक वर्षांनी आज तिला पाहून
खूप बरं वाटलं
बालपणीच्या आठवणींना
उजाळा देत हृदय दाटलं

ती एक बालपणीची
जिवलग मैत्रिण होती
हसणे खेळणे कुदळणे मनसोक्तफिरणे
तेव्हा तिचीच तर साथ होती

वाकडी तिकडी मजेशीर
अशी माझ्या शाळेची वाट होती
बालपणी तुरुतुरु चालायची
खरंच वेगळीच मजा होती

संजय गायकवाड
छत्रपती संभाजी नगर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles