‘माळलेला तो ‘धुंद मोगरा’ तो नेहमी हृदयात ठेवायचा’; सविता पाटील ठाकरे

‘माळलेला तो ‘धुंद मोगरा’ तो नेहमी हृदयात ठेवायचा’; सविता पाटील ठाकरे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेचे परीक्षण_

माळ सखे केसात चैतन्याचा झरा,
धुंद मोगरा साजीरा ll
विसरूनी पुन्हा सर्व मांडीयला,
नव्याने खेळ सारा ll

सखी…, तुझे ते लाजणे माझ्या मनाचा ठाव घेते, तुझी ती गालावरची खळी माझे मन चिंब करते. तुझ्या त्या कस्तुरीच्या गंधाने मी मुग्ध होतो, तो केसात माळलेला मोगरा मला धुंद करतो.

साजणा… होय रे साजना.. मी माळलाय मोगरा माझ्या केसात, तो धुंद मोगरा फक्त तुझाच आहे. त्याच्या प्रत्येक पाकळीत तुझा श्वास, तो केवळ माझा आहे केवळ माझाच आहे.

सखे.., तुझ्या प्रेमाच्या आनंदांनं चिंब न्हावून निघालोय मी, लहरी वाऱ्याच्या हिंदोळ्यावर मनसोक्त झुळतोय मी. अन् धुंद मदमस्त सुवासिक मोगऱ्याने, आठवणीत उधळून गेलो मी.

साजणा…..
ती आग उन्हाळी आज शितल साही..
गंध उधळीत उधळीत आली….
धुंद मोगऱ्याच्या सुवासिक साक्षीने…
तन मनाने मी तुझीच झाली.. तन मनाने मी तुझीच झाली.

‘धुंद मोगरा……..’ ‘कल्पनेच्या पलीकडचं त्या दोघांचं ते विश्व, ना कुणाची चिंता ना कुणाची भीती. कैफ आहे तोही केवळ प्रेमाचा…’ फुललेला तो मोगरा आणि त्याच्या श्वासाने सारा आसमंत दरवळलेला. प्रेमाच्या त्या स्पर्शाने अंगावर शहारा आला. अरे होय…..तुझ्या आठवणी म्हणजे धुंद मोगऱ्याच्या रूपाने मला छळणारा तो हळुवार स्पर्श, माझ्या आणि तुझ्याही मनात निर्माण होणारा हर्ष.

तो स्पर्शगंध तुला काय सांगून गेला? गालावरती तुझ्या न माझ्या रक्तीमा खुलवून गेला. तिची ती सवयच आहे. केसात मोगऱ्याचा गजरा माळण्याची, तिच्या त्या गजऱ्यावर तो
भाळायचा. जरा का नजरेआड झाला की, ती त्याला शोधायची..दिसला की स्वतःच नजर झुकवायची. पण, माळलेला तो ‘धुंद मोगरा’ तो नेहमी हृदयात ठेवायचा….!! कारण, त्या धुंद मोग-यात श्वास होता, भास होता आणि एक आस होती. पुन्हा भेटण्याची, मधुमिलनाची. आजही तो मोगरा जपून ठेवलाय हृदयाच्या कुपीत.

रसिक सृजनहो…
मोगरा फुलला मोगरा फुलला,
फुले वेचिता भरून
कळीयासी आला.

आनंदाच्या डोही आनंद तरंग ..असा आनंद तरंग तमाम मराठी भाषा रसिकांच्या मनात फुलविण्याचे काम करणारे ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय ‘राहुल सर’ यांनी बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेसाठी “धुंद मोगरा “हा विषय दिला अन् सर्व कवी कवयित्रींच्या लेखणीतून जणू मोगऱ्याचा गंध दरवळला. कुणी आठवणींच्या हिंदोळ्यात तर कुणी प्रेमाच्या बागेत सैर केली. एकापेक्षा एक सुंदर रचनांनी आज समूहात धुंद मोगऱ्याचा गंध पसरला. तेव्हा तुम्हा सर्व कवी कवयित्रींचे मनापासून अगदी मनापासून अभिनंदन पुढील लिखाणास अनंत कोटी शुभेच्छा.

सौ. सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक,प्रशासक, लेखिका, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles