“शरीरातील आंतरिक ऊर्जा जागृतीसाठी हस्तमुद्रेची गरज”; स्वाती मराडे

“शरीरातील आंतरिक ऊर्जा जागृतीसाठी हस्तमुद्रेची गरज”; स्वाती मराडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_गुरुवारीय चित्र चारोळी स्पर्धेचे परीक्षण_

*🤚विज्ञानयुग आलं‌ नि हरेक कामासाठी मशीन हजर झालं. प्रगतीच्या नावाखाली सुरू झाली माणसाची धावपळ.. नव्हे माणसाचंच मशीन होऊन गेलं. यंत्रवत उठणं, बसणं, बोलणं अन् टारगेट पूर्ण करण्यासाठी यंत्रवतच धावणं.. वेळेसाठी तो धावतोय की वेळच त्याला आपल्या तालावर नाचवतेय हेच कळेनासं झालं. शरीराला तर यंत्र बनवलं पण मनाचं काय..? मनःस्वास्थ्य मात्र हरवलं. मग सुरू झालं चिंतन, मनन..काय चुकले? कुठे चुकले? काय करायला हवे? भूतकाळाचा मागोवा घेतला..अन् समोर आला तो योगशास्त्राचा खजाना.. भारतीय संस्कृतीतील योगशास्त्राचे महत्त्व पूर्ण जगाने मान्य केले. याच योगाचा एक भाग म्हणजे ‘हस्तमुद्रा’.*

*🪸ध्यानधारणेत या हस्तमुद्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मन एकाग्र करण्यासाठी हस्तमुद्रा केली जाते. मेडिटेशन करताना एका विशिष्ट स्थितीत हात ठेवले जातात त्यास हस्तमुद्रा म्हणतात. गौतम बुद्धांची मूर्ती नेहमीच आपल्याला बद्धपद्मासनात बसलेली व हाताची ज्ञानमुद्रा केलेली या स्वरूपात पहायला मिळते. हाताची पाच बोटे प्रतिनिधित्व करतात ते अग्नी, वायु, आकाश, पृथ्वी व जल या पंचतत्वाचं. त्यामुळे त्या त्या तत्वाशी निगडित शरिरावयव प्रभावित होऊन त्यांचे कार्य नियंत्रित करतात‌. मनुष्य प्रकृतीनुसार यावर चिकित्सा करून कोणती मुद्रा कधी व किती प्रमाणात केली पाहिजे याचेही एक शास्त्र आहे. प्राचीन काळी ऋषीमुनींनी वर्षानुवर्षे तपस्या करून अनुभवाच्या आधारे हे शास्त्र विकसित केले आहे. शरीरातील आंतरिक ऊर्जा जागृतीसाठी याचा उपयोग होतो. या हस्तमुद्रांचा उपयोग केल्यास बरेचसे शारीरिक व मानसिक फायदे होतात. कदाचित त्यामुळेच कथ्थक, भरतनाट्यम यासारख्या काही नृत्यप्रकारात आवर्जून हस्तमुद्रांचा वापर केलेला दिसतो.*

अंगठा अन् तर्जनी
फक्त दोन बोटे जुळवली
शब्दांवीण ती हस्तमुद्रा
कौतुकवर्षाव करून गेली..

*🌸होय ना.. ‘खूप छान’ हे सांगायला हस्तमुद्रा वापरली तर शब्दांवीण संवाद होतो. अभिनय करताना तो प्रभावी व्हावा म्हणूनही विविध हस्तमुद्रांचा वापर केला जातो. केवळ बासरी धरल्याची हस्तमुद्रा केली तरी कान्हा डोळ्यापुढे उभा राहतो‌. डोईवर वा कमरेवर घागर घेतल्याचा अभिनयही हस्तमुद्रेतून सहज साकारतो. मोर, हरीण हे प्राणी देखील हस्तमुद्रेतून समजतात. लावणीत ठसकेबाजपणा दिसावा यासाठीही हस्तमुद्रांचा वापर होतो. बहुआयामी अशी ही हस्तमुद्रा आज चित्रचारोळी स्पर्धेसाठी आली. विविधांगी विषयावर लिहिण्यासाठी आदरणीय राहुलदादा नेहमीच वेगवेगळे विषय देतात.*

*🙏शरीर व मनाच्या आरोग्यासाठी जाणीव जागृती व्हावी या दृष्टीने दिलेला आजचा हा विषय. हस्तमुद्रांनी आजार बरे होतातच याशिवाय होऊ नयेत यासाठीही यांचा नक्कीच उपयोग होतो. गरज आहे ती डोळस अभ्यास‌ करून ते दैनंदिन व्यवहारात आणण्याची. सर्वच सारस्वतांनी हस्तमुद्रांचे महत्त्व विषद केले व आरोग्यविषयक जागर मांडला. सहभागी रचनाकारांचे हार्दिक अभिनंदन व लेखणीसाठी शुभेच्छा. आदरणीय राहुल दादांनी मला परीक्षण लेखणीची संधी दिली त्यांचे हृदयस्थ आभार.🙏*

सौ स्वाती मराडे, इंदापूर,जि.पुणे
मुख्य परीक्षक व सहप्रशासक,लेखिका
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles