शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ कविता स्पर्धेतील रचना

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*☄विषय : दवंडी☄*
*🍂शनिवार : २३ / ०३ /२०२४*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*दवंडी*

आठवतो मज अजूनही
माझ्या गावाचा तो पार
सुखदुःखाचे अनेक सोहळे
त्याने पाहिले अनेक सोपस्कार ||१||

एक होती खासियत त्याची
कधी कधी येई दवंडीवाला
आवाजाने त्याच्या जागा होई
सारा सारा मोहल्ला ||२||

दवंडी होती प्रघात तेव्हा
तिची होती निराळीच गंमत
दवंडी काहीही असली तरी
गाववाले असायचे संमत ||३||

गावाच्या विकसाच्या कामी
दिली जायची दवंडी
सूचनावजा हुकूम असायची
जाणून होती पिढी ||४||

दवंडीने कळत असायचा
तेव्हा सारा लेखाजोखा
सूचित स्थळी जमा व्हायचा
नागरिकांचा मग जथ्था ||५||

कामांचा उरक होता
होता गावाचा विकास
प्रगतीशील वाटचाल होती
पर्याय होता झकास ||६||

आता ऐकू येत नाही
कुठलीही दवंडी कानी
समाजमाध्यमे उदंड झाली
हाती आली पर्वणी ||७||

दवंडीची ती मजाच नाही
आज कुठेही उरली
हाळी त्या दवंडीवाल्याची
न जाणो कुठे विरली ||८||

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*ता.कर्जत जि.रायगड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*दवंडी*

बारा बलुतेदार पद्धतीत
गावगाड्याचा कारभार
वाटून दिलेला असायचा
प्रत्येकास हिस्याचा भार

प्रत्येकाने करावीत चोख
आपल्या हिस्याची कामे
अवलंबून सर्व परस्परावर
यादी कामाची तया नामे

सार्वजनिक माहिती मिळे
हलगी वाजवून दवंडी देत
ध्यान देऊन ऐकायचे सारे
सुचानार्थ बाब ध्यानी घेत

नव्हती आधुनिक माध्यमे
विकसित झाली त्यावेळी
आज घडीला उपलब्धता
सुखसोई मिळती यावेळी

राशन आले पिटत दवंडी
कळायचे अख्या गावाला
थैली घेऊन रांग लागतसे
वेढा पडे राशन दुकानला

घटनेचा सांगावा इत्यंभूत
दवंडी मधूनचं मिळायचा
पडता टिपरू हलगीवर्ती
लोभ कान देत ऐकायचा

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*सन्मानपत्र हवे असल्यास कृपया इच्छुक विजेत्यांनीच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*दवंडी*

मुलांनो नका पिटू दवंडी
वृध्दांची सेवा केली म्हणूनी
म्हणती कोण पाखंडी
सांगू नका उर बडवूनी ॥१॥

दिला बालपणी
कवळ मुखी त्यांनी
नका विसरू कुणी
बळ दिले आधारानी ॥२॥

आता होऊन
तयांची काठी
सेवा करून
मारा प्रेमाने मिठी ॥३॥

कनवटीची पुंजी
गेली तुम्हां साठी
नका घालू पैशामागे रूंजी
वात्सल्य ही देणगी मोठी ॥४॥

दोन दिसाचे सोबती
केले केले नका पिटू दवंडी
शाबूत ठेवून मती
नकोत्या पिटवू कंडी ॥५॥

नका लपू भिंती आड
येता करण्याची वेळ
एकत्र येऊन भावंड
घाला एकजुटीने मेळ ॥६॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*दवंडी*

पूर्वी नव्हते संपर्क
वा प्रसाराचे माध्यम
जाहिरात देण्यास
दवंडी असे कायम

दवंडीच्या पुकाऱ्याने
जमायचे नागरिक
एकत्रीत सहभागाने
कामे व्हायची क्षणिक

माहिती तंत्रज्ञानाच
वार शिरलं गावात
दवंडीची आरोळी
जमा झाली इतिहासात

काळासोबत हलगी
भिंतीवर अडकली
चावडीवरची चर्चा
कायमची विसावली

एकवीसाव्या शतकी
दवंडीची बदलले रूप
ऐका हो ऐका न म्हणता
ब्रेकिंग न्यूज वाढले खूप

*कुशल गो डरंगे, अमरावती*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*दवंडी*

आला हालकीचा आवाज
प्रजा झाली गोळा
काय महाराजांचा आदेश
ऐके गाव सारा

प्रसारमाध्यमाचे साधन
दवंडी एक होते
त्यानिमित्ताने सारे गाव
एकत्र येत होते

चर्चा मसलत खलबत
चालायची मग चावडीवर
समस्यांवर उपाय निघायचे
लक्ष असायचे दवंडीवर

माणूस माणसात बसायचा
चार गोष्टी करारायचा
सुख दुःख एकमेकांचे
वाटून मोकळे व्हायचा

तंत्रज्ञान आले जगात
माणूस माणसाला विसरला
दवंडी काय असते
माहित नाही आजच्या पिढीला

वस्तू विनिमय संपले
माणूस स्वार्थी बनला
माणूसकी आपुलकी प्रेम
सारे काही विसरला

शेजारी कोण मेले तरी
माहित होत नाही
दवंडी मात्र सोशलमिडियावर
क्षणभरात पसरत राही

बदलला समाज
बदलले दवंडीचे स्वरूप
जिवंत दवंडीला आता
मिळाले तंत्रज्ञानाचे प्रारूप

*शर्मिला देशमुख *घुमरे*बीड*
*©सदस्य *मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*दवंडी*

गावाचा कारभार चालतो
ग्रामपंचायत माध्यमाने
निर्णय घेतात गावकरी
मिळून संगनमताने

सभाघेण्यासाठी प्रथम
दिली जाते गावात दवंडी
चौकाचौकात थांबून कोतवाल
विषयाची करतात कानउघाडणी

कोतवालामागे मग
पोरांचा निघतो थवा
कोतवालाच्या बोलण्यानंतर
पालुपद लावून करतात कावा

ग्रामीण भागातून पूर्वापार
चालत आलेली ही प्रथा
गावाच्या राजकारणातील
एक महत्वाचा आहे दुवा

सत्तेचे विकेंद्रीकरण झाले
स्वराज्य संस्था बळकट झाल्या
प्राचिन काळापासून दवंडी देणे
प्रत्येक गोष्टीसाठी ह्या प्रथा रूढ झाल्या

ग्रामसभा असो वा असो
सामाजिक,धार्मिक प्रश्न
दवंडी देऊन लोकांना
सूचित करण्याचा हा प्रयत्न

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*दवंडी*

भल्या पहाटे गावात
दवंडी पिटली जोरात
आली आली घंटागाडी
घंटागाडी आली दारात..//

ओला सुका वेगवेगळा
घ्यावी योग्य खबरदारी
जो आपला केर कचरा
ही आपलीच जबाबदारी.. //

लोखंड,काच, प्लास्टीक
कचर्‍यात मिसळू नका
मुक्या प्राण्यांच्या जीवास
होईल अकारण धोका.. //

खरकटे, नासके, सडके
वेळीच विल्हेवाट लावावी
आसपास घाण दुर्गंधी
कटाक्षाने सर्वांनी टाळावी.. //

घरअंगण, गल्ली, गाव
ठेवा स्वच्छ सुंदर परिसर
प्रदूषण मुक्त वातावरण
आरोग्य नांदेल निरंतर.. //

रोजच्या रोज दवंडी देत
दारी येतात स्वच्छतावाले
लक्षात ठेवा रहिवाशांनो
आपण असतो कचरावाले.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿
*दवंडी*

आला आला दवंडी वाला
लहान थोर होतात गोळा
ढोला वर पडलीय थाप
माय माऊलीस लागली धाप

बातमी आनंदाची आहे ना
कीदुःखाची मनात येती नाना
विचार हाताचे सोडून काम
भाळा वरचा टिपला घाम

ऐका हो ऐका म्हणताच
जीव आला कानातच
दंवडी होती स्वच्छतेची
गुरुकिल्लीच आरोग्याची

दंवडीत असते सुखदुख
माहिती ही मिळते खुप
जनजागृती करण्यासाठी
लक्ष सरकारचे साधण्यासाठी

*प्रा.अर्चना कृष्णराव सुदामे*
*छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🏵️🪸🏵️➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles