“दीड शतकी” मजल…म्हणजे संयमाची कसोटी; संग्राम कुमठेकर

➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*”✍️दीड शतकी” मजल…म्हणजे संयमाची कसोटी; संग्राम कुमठेकर*

➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿
*✍️सन २०१७ मध्ये “विदूषक” बनून सुरू झालेला काव्यप्रवास कधी शतकी खेळी करून गेला ते काही कळलंच नाही. नवकल्पनांना व लेखणीला जणू पंखच फुटलेले होते की काय असंच म्हणावं लागेल. मा.राहुलदादांनी सर्वोत्कृष्ट म्हणून “खातेवही” २०२० मध्ये हाती दिली तिथंच शतकी खेळी पूर्ण झाल्याचा आनंद साजरा केला आणि तिथून पुढचा प्रवास म्हणजे संयमाची परीक्षाच जणू…*

*📘नेवासा येथील अप्रतिम तो काव्यसोहळा पार पडला तोही शिलेदारांच्या प्रेमानंच जणू मला तिथं खेचून आणलं होतं. लातूर येथील घराचे काम अंतीम टप्प्यात आलेलं नि आर्थिक चणचणीतून मार्ग काढत पूर्णत्वास नेण्यासाठीची माझी चाललेली धडपड यात लेखणी नि माझा दुरावा वाढतच होता. पण फारकत घेणे तर अशक्यच ना…लेखणीशी जुळलेलं नातं अतूटच होतं. मी मनी निर्धार केला संयम सोडायचा नाही कसोटीतल्या फलंदाजाप्रमाणे दमदार खेळणे चालू ठेवायचे. त्यातून ” वाट कर्तव्याची” चालू लागलो नि पुढची खेळी सुरू झाली. अनेकदा प्रश्न निर्माण व्हायचा “गळून पडलो तर” परंतु “डोळ्यांत माझ्या” सवूताई व वैशालीताईची “उत्कट प्रीत” आशा निर्माण करायची आणि “माळरानावरचं झाड” म्हणजेच मुख्यप्रशासक राहुलदादांची साथ होतीच. “झुक झुक गाडी” चालत असताना सर्वोत्कृष्टतेचा मान देऊन “बेधुंद आसमंत” पाहून “मले न्या न जी” म्हणत लेखणी पिंगा घालू लागली.” “कोरडा पाऊस” जसा कामाचा नसतो तसंच माझी गत परंतु “किमया शब्दांची” फळाला आली नि गाडी पुन्हा धावू लागली.*

*🌸”ढगाआडचा पाऊस” सारखा प्रेमाने खुणावत होताच नि सांगत होता की तू बिनधास्त “उलाढाल” सुरू ठेव, तुझी हीच “कागदी नाव” “नवचैतन्य” निर्माण करेल.याच आशेनं मी ” “प्रेमाचा गुलकंद” चाखता चाखता “चंद्र पुनवेचा” न्याहाळू लागलो. परंतु “जनमत” न जाणल्यामुळे माझ्यावरचा “दबदबा” वाढत गेला माझ्या निर्धाराला जणू “धोरणलकवा” झालाय की काय असंच वाटू लागलं. त्यातच “फोकनाडबाजी” ला ऊत आलेला व लोकांची नको ती “बतावणी” ऐकून मन खूपदा बेचैन व्हायचं पण सर्वांचा माझ्यावरचा “भरवसा” व सवूताईनं “ओवाळणी” करताना माझ्या मनातील शंका कुशंकाना दिलेली “मूठमाती” आणि “निंदक” असल्याशिवाय जिद्द निर्माण होत नाही म्हणून मारलेली “कोपरखळी” तर अविस्मरणीय अशीच. त्यातच मी “निमित्तमात्र” पण संग्रामदादा “गुण्यागोविंदाने” तू लेखणी हातची न ठेवता “क्षितिज गाठतांना” होणारी “अवहेलना” विसरायची असते.अरे “फक्त भितोय आम्ही” सत्याची कास धरताना नाहीतर बौद्ध काळाचा तू जरा विचार कर ,किती कष्ट घ्यावे लागले असतील “शैलगृह” उभी करताना, तू तर स्वतः साठी घर बांधतोयस, होईल पूर्ण,सर्व शिलेदारांच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत. असा हताश झालास तर तुझ्या पाहिलेल्या स्वप्नांंचा “खेळखंडोबा” होईल आणि असा तू “बस्तान” बसण्यापूर्वीच पळ काढलास तर तुझ्या संग्राम नावाला काय अर्थ आहे रे…संग्रामभावा तू तुझ्या निर्धाराशी “कटीबद्ध” राहा. परिस्थितीनं कितीही “चकवा” देण्याचा प्रयत्न केला तरीही संकटांना “आळवावरचं पाणी” समजून “कंदिलशून्य” लोकांकडे दुर्लक्ष कर नि तुझ्या “प्रतिभेची प्रतिमा” दिसू दे मग माझी व वैशूताईची पण मान अभिमानानं उंचावेल. हीच प्रेमाची चादर माझ्यामध्ये ” आस सावलीची” जागवून गेली. नव्या उत्साहानं मी “गुरूवंदन” केलं नि लेखणीला पण “सूर जुळावे फिरूनी” म्हणून पंचप्राण एकवटून कुरवाळू लागलो.परंतु काही “झोलछाप” लोकांच्या “गुजगोष्टी” कानावर येतच होत्या. “कळत-नकळत” लेखणीतून शब्दफुले थिरकू लागली नि त्यातच “क्षण मोहरलेले” सर्वोत्तम मी पाहिले व माझ्या “अतूट विश्वास” जागा झाला.तेव्हाच “चाहूल थंडीची” लागली आणि “काजव्याच्या राती” “विश्वासाची वीट ” रचतानाच “संविधान एक हक्क” हा महामानव प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखणीचा करिश्मा अनुभवला व त्यातून माझ्या मनात निर्माण झालेली माझीच “वैरी प्रतिमा” मी पुसून टाकली. हे करतांना “त्या भूलथापा” विसरून “अश्रूंचे संदर्भ ” शोधले नि “तूच माझी सावली” म्हणत सर्वोत्कृष्ट लेखणीलाच पुन्हा मी जवळ केलं. “किती बघावी वाट” म्हणून पैशाची चणचण ” उसनवारी” करून दूर केली नि “प्रजासत्ताक” दिनाचे माहात्म्य जाणले. माझी सारी “वंशावळ” शोधून काढली. हातभार लागेल म्हणून “आर्जव” केला परंतु “गणगोत” जवळून पाहत होतो व मनाला सांगत होतो “रंग हे नवे” जाणून घे. “ओढ तीच अजूनही ” किती दिवस तू ठेवणार. “रेशमी घरटं” पूर्ण करताना ” तुटलेलं मन” सांधण्याचं काम शिलेदार परिवाराकडून सुरूच होतं. “देवा तुझे आभार” म्हणून नव्या जोमाने “जीवनगाणे” गायचे ठरविले.”गुपचूप” प्रयत्नांना सर्वोत्तम यश मिळाले व मनाची “घुसमट” थांबवून “स्वंयसिद्ध” होऊन मी राहुलदादांना “साद अंतरीची” घातली नि त्यातूनच लातूरचा भव्यदिव्य सोहळा पार पाडला.” प्रेमकिनारा” तर मी गाठला परंतु “खेळ भावनांचा” सुरू झाला.”रूसणे हसणे” “क्षणार्धात” “गळफास” घेऊन जीवन संपवावे असेही वाटायचे परंतु “आत्मनिर्भर स्त्री ” पाहून पुन्हा मनात यायचं “अरे,पुरूष असून असं हातपाय काय गाळतोस,चल उठ,तुझ्या नावातच संग्राम आहे.संकटे ही पण ज्याच्यात तोंड देण्याची ताकद आहे अशांच्याच नशिबी येतात. पण तोंड देणाराच शेवटी आयुष्यात यशस्वी होतो.*

*”लोपला ज्ञानसूर्य” म्हणता म्हणता “अजूनही मनात तूच” म्हणून सर्वोत्तम लेखणीला पुन्हा हाती घेतलं.”काळ हेच औषध” म्हणतात ना तसंच माझं झालं.माझं हे “अबोल मन” पुन्हा बहरू लागलं नि आपले सर्वोत्कृष्ट “न्यायमूर्ती” राहुलदादांनी पण त्यात प्रेमाची फुंकर मारून “मनातली स्वप्ने” साकार करायची असतील व “यशाची पायरी” चढायची असेल तर मनातील “मायेचा ओलावा” जपायचा नि “धुंद मोगरा” बनून जीवनात सुगंध निर्माण करायचा हाच कानमंत्र दिला नि “धुंदीत राहू” या १५० व्या सन्मानपत्रावर माझे नाव कोरलेले पाहून मनोमनी अत्यानंद झाला.*

*✍️अशा या संयमाची कसोटी लागणाऱ्या प्रवासात जवळपास ३५० रचना लिहिल्या गेल्या.हे लिहिताना माझ्यासोबत मराठीचे शिलेदार परिवाराचे मुख्य कुटुंब प्रमुख राहुलदादा, सचिव पल्लवीताई, सवूताई, वैशालीताई, अशोकदादा, अरविंददादा, तारकाताई, सुधाताई, स्वातीताई, विष्णूदादा, किशोरदादा, विकास व असंख्य शिलेदार ताई दादांची साथ होती म्हणूनच मी सहजतेने हा दीडशतकी प्रवास करू शकलो. दि.०१/०७/२०२३ ला राहुलदादांनी साहित्यगंधच्या “सहसंपादक” पदी निवड करून यथोचित सन्मान केला “काव्यभूषण पुरस्कार” “काव्यरत्न पुरस्कार” “मुख्य आयोजक” म्हणून जबाबदारी पार पाडणे असो की समूहात परीक्षण,संकलक म्हणून जी जबाबदारी आहे ती पार पाडताना खूपदा अडचणी येत होत्या या धावपळीने परंतु सर्वांनी समजून घेऊन माझ्यातला कवी जीवंत ठेवला त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार न मानता आजन्म ऋणात राहून माय मराठीच्या सेवेत शेवटच्या श्वासापर्यत सोबत राहण्याचे वचत देतो व थांबतो…..माझ्यावर सदैव प्रेमळ शुभेच्छांचा वर्षाव करणाऱ्या सर्व शिलेदार ताई दादांचेही मनःपूर्वक धन्यवाद ! ! ! !*🙏🙏🙏🌹🌹

➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿
✍️ *श्री.संग्राम कुमठेकर*
*मु.पो.कुमठा (बु.)*
*ता.अहमदपूर जि.लातूर*
*सहप्रशासक/परीक्षक/संकलक*
*©️मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🙏✍️🙏➿➿➿➿

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles