“मानवी बुद्धी म्हणजे,कल्पनेचे उगमस्थान…”; विष्णू संकपाळ

“मानवी बुद्धी म्हणजे,कल्पनेचे उगमस्थान…”; विष्णू संकपाळ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शुक्रवारीय हायकू काव्यपरीक्षण_

‘कल्पना’ ही एक अशी शक्ती आहे की जिच्या जोरावर माणूस हवेत रंगमहाल बांधू शकतो तर वाळूत किल्ले बांधू शकतो. बिनपंखाचा हवेत उडू शकतो. तर सागरतळी बिनदिक्कत लपू शकतो. परग्रहाची सवारी करू शकतो. तर आकाशातले तारे तोडून आणू शकतो. कल्पनेच्या कोषात असंभव असे काहीच नाही. म्हणून तर कल्पनेविना कल्पनेची आपण कल्पनाच करू शकत नाही.

लहानपणी शालेय अभ्यासक्रमात एक वाक्य प्रत्येकाने वाचले असेल “गणपत वाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच काडी, आणि म्हणायचा या जागेवरती बांधीन माडी” किंवा गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली. अचाट आणि अतर्क्य कल्पितांच्या खेळांची गुरूकिल्ली म्हणजे कल्पना. थोडक्यात कल्पनेच्या कुंचल्याने चितारलेली हर चीज इतकी खुबसुरत असते की ती मनभावन मनप्रसन्न फुलपाखरूच भासते.

*कल्पना शक्ती*
*अतर्क्य लीला बुद्धी*
*पणास युक्ती*

मात्र काही कल्पना अशाही असतात की त्या वास्तवातही उतरतात. हवेत उडणारे विमान असो की पाण्यावर तरंगणारे अजस्र जहाज असो सुरवातीला ही कल्पना एक वल्गनाच वाटायची.म्हणून तर त्या त्या काळात संबंधित शोधकर्त्यांना लोक वेड्यात काढत असत. असे म्हंटले जाते की गरज ही शोधाची जननी आहे. किंबहुना एखाद्या गोष्टीची गरज भासल्याशिवाय त्याच्या शोधाचा उगम होतच नाही. असो हा वास्तविकतेकडे जाणारा विषय थोडा वेगळा आहे. मात्र मी कल्पनाशक्तीवर भाष्य करतो आहे.

*मानवी मन*
*अविष्कारी सृजन*
*कलादर्शन*

आज शुक्रवारीय हायकू स्पर्धेसाठी समूह प्रमुख आदरणीय राहुल दादांनी दिलेले चित्र याच अफलातून कल्पनाशक्तीचे मूर्तीमंत उदाहरण आहे. भलामोठा कोबीचा गड्डा, चक्क त्याची आकर्षक दुचाकी, आणि तो चालवणारा निरागस बालक. नयनमनोहर कल्पना याहून वेगळी काय असू शकते? आणि हायकू सारख्या काव्यप्रकारासाठी जेंव्हा असे चित्र येते तेंव्हा हायकूकारांची कल्पनाशक्ती पणाला लागली नाही तरच नवल. याच चित्रातून सुद्धा एक क्षण पकडायचा आहे आणि पाच +सात+पाच या आकृतीबंधात विशेष कलाटणीसह बसवायचा आहेच विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या आणि तिसर्‍या किंवा दुसर्‍या आणि तिसर्‍या ओळीत यमक जुळला पाहिजे. हे आव्हान अनेक शिलेदारांनी लिलया पेलले आहे.. काहींचे प्रयत्न विशेष कौतुकास्पद आहेतच. कधी वास्तविकतेचे विदारक दर्शन घडविणारे चित्र तर कधी निखळ मनोरंजन करणारे चित्र देऊन आदरणीय राहूल दादा आपल्या कल्पकतेला नेहमीच वाव करून देत असतात. आणि आपल्यातल्या प्रतिभेला जागे करत असतात. सातत्याने वेगळा प्रयोग हाच त्यांचा स्थायीभाव आहे.

*स्वप्नांची गाडी*
*निरागस बालक*
*होई चालक*

आजही समस्त शिलेदारांनी समर्थपणे हे आव्हान पेलले आणि हायकू स्पर्धेत चांगलेच रंग भरले. सर्वांच्या लेखणीला आणि भावी लिखाणाला भरभरून शुभेच्छा. आज मला हायकू परिक्षण लिहिण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय राहूल दादा आणि प्रशासकीय टिमचे मनःपूर्वक धन्यवाद

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles