आम्रवृक्ष; दीपककुमार सरदार

आम्रवृक्ष



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

काळ्याभोर वावरात
उभा स्तब्ध आम्रवृक्ष
कडू गोड आठवणी
देत असे सदा साक्ष.

काळ्या शेत बांधावर
आला आंब्याला मोहर
त्याच्या धुंद सुवासाने
हर्ष विभोर भ्रमर.

काळ्याभोर वावरात
अशी दाट छाया पडे
थकलेल्या पांथस्थाला
खाली झोपणे आवडे.

वावरात बांधावरी
लिंब बाभळी संगत
अंगाखांद्यावरी पक्षी
पहा बसली पंगत.

जीर्ण झाल्या फांद्या जरी
अजुनही खुणावतो
कसे उन्हात जगावे
साऱ्या जगाला सांगतो.

दिपककुमार सरदार
ता. लोणार जि. बुलढाणा
==========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles