स्पर्शिका
एकाच बिंदुतून जाणारी
मीच तुझी रे स्पर्शिका
तुझ्या बासरीच्या सुरांवर
लब्ध मी तुझी राधिका
नव्हतेच मागिले परीघ
नव्हतीच मागिली त्रिज्या
तुझ्या सान्निध्याने पावन
फक्त तुझीच ही स्पर्शिका
नको दुभंगणारा व्यास
नकोच मजला अवघे प्रतल
फक्त विश्ववर्तुळ सांधणाऱ्या
कृष्णाची ………………..
असावी मी स्पर्शिका
असावी मी राधिका
- वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
===========