आठवणींच्या खुणा; अर्चना ईंकने

आठवणींच्या खुणा



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मासूम चेहऱ्यावर
आनंदाची अनुभूती येणे
पुन्हा आशा पल्लवित
करणे त्याच आठवणीने

फक्त दोन क्षणांची
फुरसत मिळायला हवी
धावून येतात अशाच
आठवणींची शिदोरी व्हावी

कधी आनंद कधी दुःख
आसवांची किनार ओली व्हावी
भूतकाळाच्या आठवणीत
भविष्याची स्वप्ने पहावी

दिवसामागून दिवस जातात
पूर्वीच्याच रस्त्यावरुन
काही क्षण चोरलेले असतात
आठवणींच्या हिंदोळ्यावरुन

विखुरलेल्या मनाला
नविन आशा मिळून जाते
आठवणींच्या डोलाऱ्यावर
एक नवी आशा दाखवते

याच आठवणींच्या सावलीत
जगण्याची प्रेरणा मिळावी
आणि याच आठवणींच्या विश्वात
जीवनाची रहस्य उलगडावी.

अर्चना राजू ईंकने
लाखांदूर भंडारा

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles