न्यु मून शाळेत दहा दिवसीय संस्कार शिबिरास प्रारंभ

न्यु मून शाळेत दहा दिवसीय संस्कार शिबिरास प्रारंभ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्तपणे भरघोस प्रतिसाद_

अर्जुनी / मोर : स्थानिक- न्यु मून इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये दहा दिवसीय संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक,मानसिक ,भावनिक, आध्यात्मिक असा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच जीवनोपयोगी विविध कला कौशल्य वृद्धिंगत व्हावे, विद्यार्थ्यांचा पुस्तकी शिक्षणासोबतच कृतिशील उपक्रमातून मुलांचे भावविश्व समृद्ध व्हावे या उद्देशाने शाळेत संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित ओमप्रकाशसिंह पवार , राकेश उंदीरवाडे, तारका रुखमोडे, त्रिवेणी थेर या सर्व मान्यवरांच्या हस्ते रितसर फित कापून संस्कार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले .

शिबिरात पहिल्याच दिवशी योगा, व्हेजिटेबल पेंटिंग, झुम्बा डान्स, स्पोकन इंग्लिश क्रियाकलाप घेण्यात आले. तसेच शिबिरात क्ले मॉडेल मेकिंग, मनोरंजन खेळ ,हस्तकला, संगीत, रंगसंगती ,फन विथ सायन्स, फॉरेस्ट कॅम्पिंग ,टेबल मॅनर्स, स्ट्रेंजर इज डेंजर तसेच विविध खाद्यपदार्थ रेसिपी असे सर्व संस्कार मोती शिकवले जाणार आहेत .पहिल्याच दिवशी शाळा व शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा तब्बल 80 च्या संख्येने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे .

प्रात्यक्षिकातून संकल्पना सत्यात उतरविणे, बोलक्या रेषांची अपरिचित भाषा परिचित करून घेणे ,योगातून आरोग्य साधना अशा विविधतेतून व्यक्तिमत्व विकास हाच सर्वंकष उद्देश या शिबिरामागील साध्य होत आहे .शाळा समिती, प्राचार्य तसेच सर्व शिक्षक वृंदांच्या संकल्पनेतून साकार झालेला दहा दिवसीय शिबिर अगदी उत्साहात सुरू आहे. परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य राकेश उंदिरवाडे व पर्यवेक्षिका तारका रुखमोडे यांनी केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles