माझी पाककला ‘समुद्र सोख ग्रीन चाट’

माझी पाककला



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

‘समुद्र सोख ग्रीन चाट’

साहित्य: पाच ते सहा समुद्र सोखाची पाने, एक कप चना डाळीचे पीठ, धने जि-याची पूड, हिरवी मिरची, लसण पेस्ट एक चमचाभर, हळद, मीठ, खाण्याचा सोडा चिमूटभर, तळण्यासाठी तेल.

सजावटीसाठीः कपभर गोड दही, पुदीना चटणी, चिंच चटणी, एक चमचा डाळींब दाणे, चिरलेली कोथिंबीर, बारीक शेव.

कृतीः समुद्र सोखाची पाने धुवून घ्या. चना डाळीचे पीठ पातळसर भिजवा. त्यात मिरची लसण पेस्ट, हळद, मीठ, सोडा, धने जि-याची पूड घाला. नीट कालवा. कढईत तेल गरम झाल्यावर एकेक पान पीठात घाला. तेलात तळून घ्या. प्लेटमध्ये ठेवा. त्यावर दही घाला. पुदीना, चिंच चटणी घाला. शेव भुरभुरवा. कोथिंबीर व डाळींब दाणे घालून खायला द्या चटपटीत समुद्र सोख ग्रीन चाट.

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
===========

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles