Tata Elxsi करणार यंदा 2,000 फ्रेशर्स इंजिनिअर्सची भरती

Tata Elxsi करणार यंदा 2,000 फ्रेशर्स इंजिनिअर्सची भरती



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

डिझाइन आणि तंत्रज्ञान सेवा प्रदाता कंपनी Tata Elxsi 2024-25 या आर्थिक वर्षात साधारण 1,500 ते 2,000 फ्रेशर्स इंजिनिअर्सची भरती करणार आहे. मार्च 2024 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्यासाठी आयोजित कॉन्फरन्स कॉलमध्ये कंपनीने याबाबत माहिती दिली. मात्र कंपनीने असेही सांगितले की, ते नवीन लोकांना नियुक्त करताना थोडी सावधगिरी बाळगतील. येत्या वर्षातील महसूल कसा आहे यावर आधारित नियुक्त्यांचे मूल्यांकन केले जाईल. कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षात 2,135 फ्रेशर्सची नियुक्ती केली होती.

दुसरीकडे Tata Elxsi चा मार्च 2024 तिमाहीचा निव्वळ नफा 2.2 टक्क्यांनी घसरून 196.93 कोटी रुपये झाला. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीने 201.51 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. तिमाहीत ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल वार्षिक 8.1 टक्क्यांनी वाढून 905.94 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी याच काळात तो 837.91 कोटी रुपये होता. होते. एकूण खर्च वाढून 677.21 कोटी रुपये झाला, जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 613.39 कोटी रुपये होता.

संपूर्ण आर्थिक वर्ष 2023-24 साठी Tata Elxsi चा निव्वळ नफा 792.23 कोटी रुपये होता. यापूर्वी 2022-23 या आर्थिक वर्षात तो 755.19 कोटी रुपये होते. कंपनीने सांगितले की, ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल 2023-24 या आर्थिक वर्षात 13 टक्क्यांनी वाढून 3,552.14 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. एका वर्षापूर्वी तो 3,144.72 कोटी रुपये होते. या कालावधीत EBITDA मार्जिन 29.5% होते. कंपनीच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी 700 टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles