वेगळ्या वाटा
वळणावळणाच्या
असती वेगळ्या वाटा
अनवाणी चालताना असा
रूतला पायात काटा||१||
प्रत्येक वळणावरी
असे मार्ग खडतर
अनमोल वाटेतूनी
होई प्रवास सुखकर||२||
अशा वेगळ्या वाटा
मिळती वळणावरी
तुझी माझी भेट सखे
झाली एका वाटेवरी||३||
प्रश्नांची उत्तरे शोधता
माझा मार्ग हरवतो
वेगवेगळ्या वाटेवरी
मला नकळत सावरतो||४||
अशा वेगळ्या वाटा
पहा येती जीवनात
आयुष्य हे बदलती
कसे एकाच क्षणात||५||
विनायक कृष्णराव पाटील बेळगाव