
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील पयडीच्या जंगल परिसरात पोलिस व नक्षलवादी यांच्यात चकमक उडाली. यात 13 नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे स्वतः गडचिरोलीत येऊन याबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. आज दुपारी एक वाजता त्यांची पत्रकार परिषद गडचिरोली येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. सर्व घटनेचा सविस्तर वृत्तांत आपल्यापर्यंत दुपारी पोहोचविला जाईल.