
भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडचिरोली येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसतर्फे मंत्री ना. विजय वड्डेटीवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश महासचिव शिवानी वड्डेटीवार, कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवक काँग्रेसच्यावतीने रक्तदान शिबिर व गरजू लोकांना मास्क व सॅनिटायझरचे लोकांना वाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, कमलेश खोब्रागड़े, विकी निकोसे, आकाश बोलुवार, स्वप्निल घोसे, कल्पक मुप्पीडवार, आलोक गंगरेड्डिवार, मनोज ज़ेंघटे मिथुन गेडाम, आशीष वाढई, बबलू कोतकोंडावर, पिंटू वढाई उपस्थित होते.