सावकार…सहकार आणि आपले आदरणीय प्रकाश साहेब पोरेड्डीवार….वाचा वाढदिवस अभिष्टचिंतन

सहकार क्षेत्र…आणि गडचिरोली जिल्ह्यातील आदरणीय नाव म्हणजे प्रकाश सावकार पोरेड्डीवार. हे एकसंघ समीकरण. सोबतच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पटलावर अधोरेखित होणारे आदरणीय प्रकाश सावकार पोरेड्डीवार.

गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रात सहकारमहर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार आणि जेष्ठ सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचा विशेषतः नामोल्लेख होतो. आज प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने हा विशेष लेखप्रपंच….पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सावकार…सहकार आणि आपले आदरणीय प्रकाश साहेब पोरेड्डीवार. केवळ सहकार क्षेत्रच नाही, तर सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान खूपच महत्वपूर्ण आहे. कितीतरी अगणिक झाडीपट्टी नाटकाचे उद्घाटन आदरणीय प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते झाले. गोरगरिबांना मदत, त्यांची अडली-नडलेली कामे करण्यासाठी अवघे सावकार वाडा तप्तर असतो. कधीही जा, वाड्यात अडचण आणि समस्या मार्गी निघेलचं निघेल.

गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रासह अन्य विविध क्षेत्रात कार्यरत आणि सक्रिय सहभाग असलेले नेतृत्व म्हणजे आदरणीय प्रकाश सावकार पोरेड्डीवार. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. आरमोरी या तालुका मुख्यालयात त्यांचा अधिवास. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील बाराही तालुक्यात त्यांचा कायम दरारा. कोरचीपासून ते सिरोंचापर्यंत त्यांची ख्याती आहे. सहकार क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी तर अतिशय व्याख्यांनाजोगी आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नागरी सहकारी बँक यांच्या माध्यमातून पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याची आर्थिक वाटचाल झाली. आज गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कितीतरी शाखा आहेत. ज्या भागात अर्थकारण काय आहे, हे लोकांना माहिती नाही, तिथं पोरेड्डीवार यांनी बँकिंग, सहकार व सहकार्य पोहोचविले.
गडचिरोली जिल्ह्याचे राजकारण म्हणजे पोरेड्डीवार घराण्याशिवाय अपूर्ण असा विषय.

विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध. यातूनच ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधान परिषद, लोकसभा अशा विविधांगी निवडणुकीत प्रकाश सावकार पोरेड्डीवार खरे ‘मास्टरमाइंड’ म्हणून ओळखले जातात.
गडचिरोली जिल्ह्यातील विविध क्षेत्रात पोरेड्डीवार घराण्यातील सदस्यांचा सहभाग असतो. त्यात प्रकाश सावकार पोरेड्डीवार अग्रणी असतात. अशा या अष्टपैलू लोकनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles