
नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात घडविण्याचा उद्देश ठेऊन जंगलात लपवून ठेवलेला नक्षलवाद्यांचा मोठा स्फोटक साहित्यसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
कुरखेडा तालुक्यातील पुराडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लवारी जंगल परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. दरवर्षी 28 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत नक्षलवाद्यांचा सप्ताह असतो. यादरम्यान नक्षलवादी हिंसक कृत्य व घातपात घडवून आणतात. त्यासाठी लवारी गावच्या जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठा स्फोटक साहित्य साठा लपवून ठेवला होता.
दरम्यान, गडचिरोली जिल्हा पोलिस दलाचे विशेष अभियान पथक या भागात शोधमोहीम राबवित होते. तेव्हा हा साहित्यसाठा आढळून आला. यातील कुकर बॉम्ब जागेवर नष्ट करून अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहेत.